Full Width(True/False)

'बंद दारामागे वैवाहिक बलात्कारासारखे गुन्हे घडतायत आणि समाज त्याला त्याला मान्यता देतो'

मुंबई: 'पिंक', 'मिशन मंगल' सारखे सिनेमे असो किंवा 'फोर मोर शॉट्स प्लीज' सारखी वेब सीरिज; अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिनं मोठ्या पडद्यापासून डिजिटलच्या पडद्यापर्यंत सगळीकडे तिच्या कामाची दखल घ्यायला लावली. प्रत्येक वेळी तिच्या पात्रातून महिला सशक्तीकरणाचा मुद्दा उचललेला दिसतो. तिच्या '' या अलीकडील वेब सीरिजमध्ये देखील वैवाहिक बलात्कारासारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं. हा विषय मांडताना मला अभिमान वाटतो; असंही ती सांगते. 'स्त्रीला सहन करावंच लागतं' या मानसिकेविषयी कीर्ती सांगते, 'हे आपल्या समाजातील कटू सत्य आहे. स्त्रियांना केवळ शारीरिक शोषणच सहन करावं लागतं असं नाही; तर तिच्यावर मानसिक, भावनिक अत्याचारही होतं असतात. खंत या गोष्टीची आहे की; हे सगळं तिनं सहन करत राहावं अशी मानसिक आपल्या समाजाची आहे. मुलींना असं सांगितलं जातं की लग्न झाल्यावर त्यात तडजोड करावी लागणारच. हेच चुकीचं आहे. समाजानं गृहित धरलंय की लग्न झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांची मालमत्ता असतात. मग बंद दाराच्या मागे एखाद्याचं शोषण सुरू असलं तरी समाज त्याला मान्यता देते. ही परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. कीर्तीनं साकारलेल्या भूमिकांना नेहमी महिला सशक्तीकरणाची कडा असते. ठरवून अशा भूमिकांची निवड करतेस का असं विचारल्यावर ती सांगते, 'ठरवून भूमिका करत नाही. परंतु, या सर्व भूमिका करताना मनाला समाधान असतं. अभिमान असतो. आपण साकारत असलेल्या भूमिकेचं काहीतरी सांगणं आहे. हे माझ्यासाठी कलाकार म्हणून महत्त्वाचं आहे. केवळ वाक्य बोलून चालत नाही. त्या वाक्यांना काहीतरी अर्थ असायला हवा. तोच अर्थ मी नेहमी शोधण्याचा प्रयत्न करत असते. समाजाला माझ्या भूमिकांमधून सत्य परिस्थिती दिसेल असा विचार मी भूमिका निवडताना करते.' नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमधलं तिच्या कामाची प्रशंसा केली जातेय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nr7hb1