Full Width(True/False)

या वर्षात सलमान खान असणार खूपच व्यग्र; 'असं' असणार त्याचं शेड्युल

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता एकामागोमाग एक त्याच्या चित्रपटांचं चित्रीकरण करतोय. सध्या त्याचं शेड्युल त्यामुळे कमालीचं व्यग्र आहे. एकीकडे ‘’चं चित्रीकरण सुरू आहे. दर आठवड्याला दोन भागांमध्येच सलमान असला, तरी एकाच दिवसात या दोन्ही भागांचं चित्रीकरण केलं जातं.आठवड्यातल्या इतर भागांच्या तुलनेनं वीकेंडचे हे भाग मोठे असल्यानं चित्रीकरणासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे सलमान पू्र्ण एक दिवस ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणात व्यग्र असतो. दुसरीकडे तो त्याच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरणही करतोय. ‘’ या चित्रपटाचं काम तो करतोय. येत्या काही दिवसांत सलमान आणखी काही मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर सलमान पुढच्या महिन्यापर्यंत दिग्दर्शित ‘अंतिम’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून ‘’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तो अविनाश सिंग राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहे; तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत परतणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3accoHh