Full Width(True/False)

पामेला एंडरसनने वयाच्या ५३ व्या वर्षी सहाव्यांदा केलं लग्न

न्यूयॉर्क- लोकप्रिय 'बेवॉच' स्टार आणि अमेरिकन अभिनेत्री पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकली आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी तिने स्वतःच्या बॉडीगार्डशी डॅन हेहर्स्ट याच्याशी लग्न केलं. पामेलाचं हे सहावं लग्न आहे. स्वतः पामेलाने स्वतःही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. डेली मेलशी झालेल्या मुलाखतीत पामेलाने तिच्या बॉडीगार्डसोबतच्या लग्नाबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. पामेलाने या मुलाखतीत सांगितलं की, '' चर्चा आपल्या अंगरक्षकांशी प्रेम आणि लग्नाबद्दल काही गोष्टी बोलल्या आहेत. पामेला या संभाषणात म्हणाली, 'मी प्रेमात आहे. ख्रिसमसच्या संध्याकाळी आमचं लग्न झालं. आमच्या दोन्ही कुटुंबियांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आम्हाला ओळखत असलेला प्रत्येकजण या लग्नासाठी आनंदी होता.' पामेलाला तिचं हे सहावं लग्न आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकेल अशी आशा आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'माझ्या आजी- आजोबांचं घर मी २५ वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं, त्याच स्थानी आम्ही लग्न केलं. इथेच माझ्या आई- बाबांचंही लग्न झालं होतं. ते आजपर्यंत एकत्र आहेत. मला वाटतं की माझं एक चक्र पूर्ण झालं.' पामेला पुढे म्हणाली, 'मला जिथे रहायचं होतं मी आता तिथेच आहे. माझ्यावर खरोखर प्रेम करणाऱ्या माणसाच्या मी मिठीत आहे.' करोना महामारीमुळे पामेलाला तिच्या लग्नाला पाहुण्यांना बोलावता आलं नाही. पामेला आणि डॅन यांची पहिली ओळख गेल्या वर्षी लॉकडाउनच्या सुरुवातीला झाली होती. दोघंंही पहिल्या भेटीतच प्रेमात पडले आणि तेव्हापासून एकमेकांना डेट करू लागले. इथे पाहा पामेलाने कधी आणि कोणासोबत केलं आहे लग्न - टॉमी ली (१९९५-१९९८) - किड रॉक (२००६-२२०७) - रिक सैलमॉन (२००७-२००८) - रिक सैलमॉन (२०१४-२०१५) - जॉन पीटर्स (२०२०-२०२०) - डैन हेहर्स्ट (२०२०)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3t48Dwb