Full Width(True/False)

'या कठीण काळात निर्मात्यांना समजून घेण्याची सध्याची गरज'

प्रसाद पवार ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘बस्ता’, ‘सातारचा सलमान’, ‘आंबट शौकीन’, ‘जीएफबीएफ’ आणि ‘’ या चित्रपटांमध्ये अक्षय नेहमीप्रमाणे हट के भूमिकांतून समोर येतोय. मनोरंजनसृष्टी पुन्हा कार्यान्वित झाल्यानं कलाकारांना दिलासा मिळाल्याचं तो सांगतो. एकपात्री नाटकावर तू एकपात्री चित्रपट करतोयंस असं कळलं, काय आहे हा प्रयोग? - हा दीड ते पावणेदोन तासांचा चित्रपट असेल. ‘मूषक’ असं त्याचं नाव आहे. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. यापूर्वी एकपात्री चित्रपट झालाय; पण त्यात इतर पात्रं दिसतात. यात माझ्याशी संबंधित इतर पात्रांचे फक्त आवाज असतील. हा प्रयोग यशस्वी व्हावा अशी इच्छा आहे. यात माझ्या भूमिकेला खूप छटा आहेत. समस्यांनी ग्रासलेला तरुण मी साकारतोय. जो आजच्या तरुणाईला रिलेट होईल. तो इंजिनीअर आहे, त्याला अभिनेता व्हायची इच्छा आहे. अडचणींवर मात करून पुढे कसं जायचं, हे सांगणारी ही कलाकृती आहे. पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजचा विद्यार्थी ते आज कॅरेक्टर रोल्स ही खासियत असणारा अभिनेता हा प्रवास कसा आहे? - खरं तर कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाचा स्वतंत्र प्रवास सुरू होतो. आज मी जो काही आहे, ती दिशा मला बीएमसीसीमुळे मिळाली, असं निश्चित म्हणू शकतो. तिथं प्रवेश मिळणं, हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. झिरोचं शंभर होणं तिथं घडलं. इथंच पाया मजबूत झाला आणि आतापर्यंत तरलो. अभिनयासंदर्भात जे येतं, ते सगळं मी तिथं शिकलो. चित्रपटांच्या नावांपेक्षाही कॅरेक्टर रोल्ससाठी जसं की, बत्तीस वगैरे नावांनी ओळखलं ‌जाणं अभिनेता म्हणून कौतुकाचं की रिस्की? - मला ही कौतुकाचीच थाप वाटते. आपल्याला त्या नावानं रसिक ओळखत असतील; तर त्यांना आपण रिलेट झालो, त्यामुळे ही ओळख त्यांच्या मनात राहिली. ही तुमच्या अभिनयाला रसिकांकडून मिळालेली पावतीच आहे. बत्तीस, रम्या, जगन्या, रंग्या अशा अतरंगी भूमिका साकारायला मजा येते. मी या साचात बसतो, त्यामुळे माझा त्यासाठी विचार होतो, हे मला महत्त्वाचं वाटतं. इंडस्ट्री, कामांची पद्धत, कलाकृती हे सगळंच कोव्हिडनं बदलून टाकलं, अशावेळी कलाकार म्हणून आता काय आव्हानं जाणवतात? - काम सुरू झाल्यावरही काळजी घेत राहणं गरजेचं आहे. जितकं नव्या गोष्टी स्वीकारून पुढे जाऊ, तितकं लवकर त्यातून बाहेर पडता येईल. काम सुरू झाल्यावर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हा मराठी चित्रपट संपवला. मराठी आणि तेलगू अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट झालाय. ज्ञानदा रामतीर्थकर, शुभंकर तावडे, पार्थ भालेराव आणि मी सेटवर धमाल केली. गेल्या काही दिवसांत कलाकारांच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्हं निर्माण झालं होतं. त्यामुळे कामाची सुरुवात झाली आणि दिलासा मिळाला. नाटकं ही कला किंवा प्रायोगिकसाठी पुढचा काळ कसा असेल? - कला या माध्यमाला काही फरक पडणार नाही. जे घडलंय, ते काही काळापुरतं होतं. पुण्या-मुंबईसह कोल्हापूर, सांगली, नाशिक अशा सर्वच ठिकाणची प्रायोगिक करणारी युवा मंडळी आता सज्ज आहेत. कलाकार हा प्रयोगांसाठी झगडत असतो आणि नाट्यगृहं हीच त्या प्रयोगांची जागा आहे. नाटक प्रेक्षागृहातच रंगतं. टाळ्या-शिट्ट्यांच्या आवाजात त्याची मजा आहे आणि चित्रपट हा चित्रपटगृहांतच.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nHyZjA