न्यूयॉर्क- माजी राष्ट्रपती यांनी आपल्या राष्ट्रपती पदाच्या शेवटच्या काही तासांचा उपयोग करत १४३ जणांना क्षमा करत त्यांची तुरुंगातून सुटका केली. यात यालाही पूर्णपणे माफ केलं आहे. त्याला मियामी इथे स्वतः जवळ बंदूक ठेवण्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकलं होतं. यासोबतच स्वतःकडे हत्यार ठेवल्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असलेल्या अजून एका रॅपरची कोडक ब्लॅक याची ट्रम्प यांनी सुटका केली. वेन याने अनेक प्रकारे दानधर्म करून ट्रम्प यांच्या उदारतेची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या दानधर्मात अन्न, इस्पितळ अशा मुलभूत गरजांना तो मदत करणार आहे. वेन याने ट्रम्प यांचे आभार मानणार एक ट्वीट केलं. यात त्याने लिहिले की, 'माझ्याकडे माझ्या कुटुंबाला, कलेला आणि आपल्या देशाला द्यायला खूप काही आहे हे राष्ट्रपती ट्रम्प यांनी ओळखलं यासाठी त्यांचे मनापासून आभार.' यावेळी त्याने आपल्या वकिलाचेही आभार मानले. वेनने लिहिले की, 'मी माझे वकील ब्रॅडफोर्डकोन यांचाही आभारी आहे. त्यांनी माझ्यासाठी जीवपणाला लावून काम केलं. तुम्हाला खूप सारं प्रेम - ड्वेन माइकल कार्टर ज्युनिअर.' ट्रम्पसोबतही दिसलेला लिल वेन ऑक्टोबरमध्ये निवडणुकांच्या आधी लिल वेन याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत फौजदारी न्याय सुधारणांच्यां कामांसाठी ट्रम्प यांना थम्ब्स अप करून दाखवताना दिसत होता. हा फोटो तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KDI8fP