मुंबई: हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह विधानांमुळे राजकीय नाट्य रंगवणारी ही '' ही वेब सीरिज वादात सापडली आहे. अनेक कलाकारांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्री हिनं देखील या वादात उडी घेतली असून नुकत्याच तिनं केलेल्या एका ट्विटची सध्या चर्चा सुरू आहे. 'मी देखील हिंदू आहे पण, यातील कोणत्याच दृश्यामुळं नाराज झाले नाहीए', असं स्वरानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट केल्यानंतर स्वराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. एकानं लिहिलं आहे की, तू हिंदू आहेस तर मी पण निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची माफी ‘ ’मधील देवदेवतांविषयी चुकीच्या चित्रणामुळे हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून निर्माता-निर्देशक, लेखक आणि अन्य काही जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर वेबसीरिजच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात ‘तांडवच्या माध्यमातून भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही बिनशर्त माफी मागत आहोत,’ असे म्हटलं आहे. काय आहे वादग्रस्त दृश्य? अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अभिनेता युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात शिवाच्या वेशात दिसतो. झीशन युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना म्हणतो की, तुम्हाला कोणापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे. दरम्यान, नारदाच्या वस्त्रात असलेला अजून एक विद्यार्थी झीशानला म्हणतो की, 'नारायण-नारायण. देव काहीतरी कर. भगवान रामाचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत असतात. 'मला वाटतं आपणही काही नवीन राजनीती केली पाहिजे. यावर झीशान म्हणतो की, "मी नक्की काय करू.. स्वतःचा फोटो बदलू का?" यावर नारद म्हणतो की 'भोलेनाथ तू फारच साधा आहेस. काहीतरी नवीन ट्वीट करा. काहीतरी खळबळजनक काही प्रक्षोभक. जसे, कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी गद्दार झाले आहेत आणि स्वातंत्र्यांचे नारे लगावत आहेत.' यानंतर जीशान अयूब म्हणतो की, 'स्वातंत्र्य आणि मग बीपचा आवाज येतो.' जीशान नारद वेशात असलेल्या कलाकाराला म्हणतो की, 'जेव्हा मी झोपायला गेलो होतो तेव्हा स्वातंत्र्य एक छान गोष्ट होती आणि आता वाईट झाली का?' यानंतर जीशान विद्यार्थ्यांना म्हणतो, 'तुम्हाला कशापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे?' यावर, विद्यार्थी म्हणतात की उपासमार, सरंजामशाही, जातीवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती आवश्यक आहे. मग झीशान म्हणतो की, 'याचा अर्थ असा नाही की देशापासून स्वातंत्र्य नकोय तर देशात राहून स्वातंत्र्य हवं आहे. यांना सांगा जगा आणि जगू द्या.' हे कलाकार मुख्य भूमिकेत , डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, झीशान अय्यूब, सुनील ग्रोव्हर आणि गौहर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. टॉप कमेंट
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iv82ii