Full Width(True/False)

वॅक्सिन घेतलंं तर मास्क लावणं बंद करायचं का? अभिनेत्रीने विचारला प्रश्न

मुंबई- भारतात शनिवारपासून कोविडचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महामारी विरुद्ध च्या या लढाईत अनेकांनी या लसीकरणावर आक्षेप घेतला आहे. आता यात बॉलिवूड अभिनेत्री हिचं नावही जोडलं गेलं आहे. पूजाने पीफायजर कंपनीला आपल्या ट्वीटमध्ये टॅघ करत या लसीकरणाशी संबंधीत अनेक प्रश्न विचारले आहेत. तिचे प्रश्न पुढील प्रमाणे आहेत-जर मी कोविड- १९ चं लसीकरण करून घेतलं तर- १. मी मास्क वापरणं बंद करू शकते का- नाही२. हॉटेल आणि रेस्तराँ पुन्हा सुरू करू शकतात का? सर्वजण आपलं काम पूर्वीप्रमाणेच सुरू करू शकतात का- नाही३. शरीर कोविड विषाणूंसाठी प्रतिरोधक होईल का- होऊ शकतं... पण नक्की काही सांगता येत नाही. कोविड होणार नाही असं खात्रीने सांगता येत नाही.दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही करून घेणारी देशातली पहिली अभिनेत्री झाली आहे. लसीकरणानंतर तिने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आज, १६ जानेवारीपासून देशभरातील निवडक आरोग्य केंद्रांवर करोनाची लस दिली जात आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित राहत आहेत. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेच्या दोन मोठ्या वर्तमानपत्रांनी भारताच्या करोना लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वॉशिंग्टन पोस्टने भारतातील करोना लस Covaxin बद्दल लिहिताना म्हटलं की, ही लस योग्य पद्धतीने काम करेल की नाही याबद्दल अजून स्पष्टता झालेली नाही.त्याच बरोबर न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार मोदी भारतात करोना लसीकरणाची सुरुवात करत आहे. ही एकीकडे अभिमानाची गोष्ट असली तरी यात अनेक संभ्रमही आहेत. या लसीची चाचणी एम्समध्ये सुरू होती. पण चाचणी दरम्यान एम्सच्या कर्मचार्‍यांनी त्यामध्ये फारसा रस दाखवला नाही. एम्स येथे Covaxin चाचणी दरम्यान स्वयंसेवकांचाही तुटवडा जाणवला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38QMr0k