Full Width(True/False)

चीन सीमेवर विकी कौशलने जवानांसोबत केला गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

मुंबई- '' च्या निमित्ताने सध्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' अभिनेता विक्की कौशलचा एक धमाकेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो कडाक्याच्या थंडीच आणि पावसात चीनच्या सीमेवर १६ हजार फूट उंचावर जाऊन गोळीबारीचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विक्कीने लिहिले की, 'अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये १६ हजार फूट उंचावर इंडो-चीन सीमेवर जाणं नेहमीच लक्षात राहील. माझ्या टीममधील एका सदस्याला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्याला खाली पाठवण्यात आलं. भारतीय सैन्य आपल्या सुरक्षेसाठी सर्व ताकदीनिशी इथे ठामपणे उभी आहे. आपल्या शूरवीरांना प्रणाम, ज्यांचा (स्वतःआधी सेवा) देश सेवेवर विश्वास आहे.' विक्की कौशलचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. यावेळी अनेकांनी त्याच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमातील प्रसिद्ध संवाद हाऊ द जोश विक्की? कमेन्टमध्ये लिहित आहेत. तर काहींनी जय हिंद कमेन्ट करत देशाभिमान दाखवला आहे. या व्हिडिओवर लोकांनी भारतीय सैन्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात विक्की कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा तो एका सैनिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलझार यांच्या आगामी सिनेमात तो दिवंगत फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी आर्मी डे साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे या दिवशी भारतीय सैन्य ब्रिटीश सैन्यातून पूर्णपणे मुक्त झालं होतं. दुसरं कारण म्हणजे या दिवशी जनरल केएम करिअप्पा यांना भारतीय लष्कराचा मुख्य सेनापती (कमांडर-इन-चीफ) ही पदवी दिली होती. लेफ्टनंट करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XN1DW4