मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिचा आज वाढदिवस. पूजानं बॉलिवूडध्येही पदार्पण केलं असून तिच्या अभिनयाची चमक दाखली आहे. सध्या ती एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहात आहे. पण काही महिन्यांपूर्वी पूजा तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली होती. अभिनेता भूषण प्रधानसोबत पूजाचं नाव जोडलं जात होतं. ते दोघं चांगले मित्र आहेत, हे सर्वांनाच माहित होतं. मात्र, त्यांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. चर्चा सुरू झाल्यानंतर दोघांनीही हे फोटो त्यांच्या एका अल्बमसाठी असल्याचं सांगत चर्चांना पूर्ण विराम दिला होता. पूजानं पदार्पणापासूनच मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.. 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करून पुढे 'झकास', 'सतरंगी रे', 'पोस्टर बॉईज', 'दगडी चाळ', 'चीटर', 'भेटली तू पुन्हा', 'लपाछपी' यासारखे अनेक मराठी चित्रपट तिनं केले. 'जंगली'मधून बॉलिवूडमध्ये पूजानं दमदार एंट्री घेतली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sV48nt