मुंबई: मराठी सिने-नाट्य सृष्टीत पहिली व्हॅनिटी घेणारा कलावंत म्हणून मान मिळविलेले अभिनेता यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांसाठी एक भावुक अशी पोस्ट शेअर केली आहे. मराठी सिनेसृष्टीत महागडी गाडी विकत घेतल्याचाही मान त्यांच्याकडेचं आहे. यामागं एक कारणंही तसंच आहे. भरत जाधव यांचे वडिल हे टॅक्सी चालक होते. त्यामुळं त्यांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व केलं. वडिलांसाठी एक पोस्ट शेअर करताना भरत यांनी एक डोळ्यात पाणी आणणारा असा किस्सा शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेच आहे. काय आहे ही पोस्ट?एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला. ते प्रवासी 'ऑल द बेस्ट' च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खूप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक होंडा अकॉर्ड घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. एमडब्लू,मर्सडीज एस क्लास. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं त्यांना देऊ शकलो.अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा... आज तुम्हाला खुप मिस करतोय.तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही. कोल्हापुरात निधन भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७) यांचं २०१७ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं कोल्हापुरात निधन झालं . मुंबई येथे अनेक वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p65tFZ