मुंबई- लॉकडाऊन दरम्यान चित्रपटगृह बंद असताना अभिनेता याचे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. संजू बाबाच्या चाहत्यांनी त्याच्या या कामाचं भरभरून कौतुक केलं. रविवारी अभिनेता आणि त्याची बहीण यांना मुंबईच्या एका रेस्तराँच्या बाहेर पाहण्यात आलं. आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी अनेक चाहते तेथे गोळा झाले होते. संजयसोबत एक फोटो काढावा अशी साऱ्यांचीच इच्छा होती. संजयनेही कोणाला निराश न करता साऱ्यांसोबत फोटो काढले. यावेळी त्याने निळा रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. संजय रेस्तराँमधून बाहेर आल्यावर त्याचे फोटो काढण्यासाठी अनेक छायाचित्रकारही तिथे उपस्थित होते. दरम्यान, एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. अभिनेत्याने त्याला निराश केलं नाही. फोटो काढल्यानंतर संजय आपल्या गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. संजय ज्या प्रकारे आपल्या चाहत्यांच्या आनंदासाठी तिथे थांबला याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. तसंच त्याच्या सहृदयी वागण्याचंही यूझर कौतुक करत आहेत. दरम्यान, संजय दत्तच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच त्याचा 'टोरबाज' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यात त्याने एका क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. शरणार्थी छावणीतील मुलांना सर्वोत्कृष्ट खेळाडू बनवायचं त्याचं स्वप्न असतं. पण त्या भागात सक्रिय असलेला दहशतवाद्यांचा नेता याच्या विरोधात असतो, अशी या सिनेमाची कथा आहे. सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या संजय दत्तच्या आगामी कन्नड भाषेतील सुपरहिट सिनेमा केजीएफच्या सिक्वलकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात तो अभिनेता यश आणि रवीना टंडण यांच्यासोबत दिसणार आहे. यात तो अधीरा नावाचं पात्र साकारताना दिसणार आहे. सिनेमातत यश अर्थात रॉकी आणि अधीरामधील टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं चित्रीकरण संपलं असून पोस्ट प्रोडक्शनवर काम सुरू आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दल निर्मात्यांनी कोणतीच माहिती दिली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35PTPam