Full Width(True/False)

तीस दिवसाच्या महिन्यात चाळीस दिवस काम केल; सुलेखा तळवलकर यांनी शेअर केला अनुभव

संपदा जोशी ० '' आणि '' या दोन मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत. अनुभव कसा आहे ?- दोन्ही भूमिका एकमेकांपासून भिन्न आहेत म्हणूनच त्या साकारायला मला आवडताहेत. कथा, भूमिका, भूमिकेचं वय, लूक्स या सगळ्यात या दोन्ही मालिका एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्यामुळेच काम करायला मजा येते. ० दोन्ही मालिकांचं चित्रीकरण आणि तुझं युट्यूब चॅनल या सगळ्याचं वेळापत्रक कसं जमवतेस?- या तिन्ही गोष्टी एकत्र कशा होतात हे खरंच माहिती नाही. पण गेले दोन-तीन महिने मी तीस दिवसाच्या महिन्यात चाळीस दिवस काम केलं आहे. काम करण्याची इच्छा असली की मार्ग आपोआप मिळतो. ० तुझ्या युट्यूब चॅनलवर मुलाखतींचा कार्यक्रम करायचा विचार कसा आला ?- मी काही संकल्पनांवर विचार करत होते. एखादी संकल्पना डोक्यात आली की मी ती आधी माझ्या नावाने रजिस्टर करून ठेवायचे. त्यानंतर जमेल तसं एकेक गोष्टी करत गेले. या माझ्या चॅनलवर 'दिल के करीब' हा सेलिब्रिटी मुलाखतींचा कार्यक्रम आणि कलनरी ब्लीसवर माझा आणि माझ्या मुलीचा कुकिंग शो असे दोन्ही कार्यक्रम युट्यूबवर सुरू आहेत. आई-मुलगी एकत्र काहीतरी पदार्थ बनवत आहेत हे मी फार कमी बघितलं होतं म्हणून मी हा कार्यक्रम सुरू केला. कालांतरानं त्यावर कलाकारांनी बनवलेल्या रेसिपी देखील सुरू केल्या. ० वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका अभिनेत्री करु लागल्या आहेत. यावर तुझं मत काय?- अभिनय करताना कलाकाराचं वय हा निकष नसतो. मला एखादी लहान मुलगी की म्हातारी अशा कोणत्याही भूमिकेसाठी विचारलं तर मी तयार असेन. त्या भूमिकेचा आपण किती अभ्यास करतो आणि समोरच्याला ते कसं पटवून देतो, हे महत्त्वाचं असतं. ती भूमिका तितक्याच ताकदीची असेल तर मोठ्या वयाची भूमिका करायला काहीही अडचण येत नाही. मला अशा भूमिका करायला आवडतात. ० टीव्ही माध्यमातली तुला खटकणारी गोष्ट कोणती?- एखाद्या भूमिकेचा, सीनचा, त्यातल्या बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. लेखक खूप सुंदर गोष्टी लिहितात. पण वेळेअभावी आपण त्याला न्याय द्यायला कमी पडतोय का, असं कधीतरी वाटतं. कोणत्याही कामात शंभर टक्के द्यायचा माझा स्वभाव असला तरी कधीकधी ते शक्य होत नाही. यामुळे त्याचा त्रास होतो. इतर माध्यमात मात्र असं होत नाही. ० अनेक वर्षांपासून टीव्ही या माध्यमात काम करत आहेस. हे माध्यम किती आणि कसं बदललंय, असं तुला वाटतं?- पूर्वी टीव्हीमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचता यायचं. आता मोबाइलच्या रुपात कलाकार प्रेक्षकांच्या अधिक जवळ आले आहेत. प्रेक्षक अगदी कुठेही बसून चॅनल्सच्या ॲप्सवर मालिका बघू शकतात. मालिकाविश्वातला हा सगळ्यात मोठा आणि चांगला बदल झाला आहे. ० चित्रपटात कधी दिसणार?- मालिका, युट्यूब चॅनल या गोष्टी एकाच वेळी करता येतात. पण चित्रपटासाठी पुरेसा वेळ हातात हवा. त्यामुळे चित्रपट इतक्यात करेन असं वाटत नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36sJPnS