Full Width(True/False)

दीपिका पादुकोणने सांगितला तिच्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिच्या आगमी चित्रपटांची तयारी करत आहे. पण या व्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. दीपिका आणि तिचा पती रणवीर यांच्या लुक्सच्या चर्चा तर सोशल मीडियावर नेहमीच होत असते. पण त्यासोबत हे दोघंही मुलखतीत एकमेकांबद्दल नेहमीच भरभरून बोलतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका रणवीरबद्दल भरभरून बोलली आणि यासोबतच तिनं तिच्या आयुष्यात घेतलेला सर्वोत्तम निर्णय कोणता होता याचाही खुलासा केला. २०१३ मध्ये ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर दीपिका आणि रणवीरच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. २०१८ मध्ये हे दोघंही इटलीच्या लेक कोमो येथे लग्नाच्या बेडीत अडकले. पण रणवीरशी लग्न करण्याचा निर्णय आपण का घेतला याचं कारण दीपिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं. यासोबतच हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचंही तिनं सांगितलं. दीपिका म्हणाली, ‘मला त्याचा सर्वात आवडलेला गुण हा होता की तो मला मिळणाऱ्या यशबद्दल खूप आनंदी असतो. जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरूवात केली त्यावेळी माझं करिअर यशाच्या शिखरावर होतं. माझे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले होते आणि तो त्याचा करिअरचा अगदी सुरुवातीचा काळ होता. त्याच्या तुलनेत माझी कमाई त्यावेळी जास्तच होती. पण ही गोष्ट कधीच आमच्या नात्यात अडथळा ठरली नाही. याउलट त्यानं नेहमीच माझ्या कामाचं आणि यशाचं कौतुक केलं. माझा सन्मान केला.’ दीपिका सांगते, ‘मी रणवीरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याने नेहमीच माझा, माझ्या कामाचा आणि माझ्या कमाईचा सन्मान केला. त्यावेळी त्याला कोणताही कमीपणा वाटला नाही. आजची त्याची कमाई आणि त्याला मिळणारं यश हे ७ वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूपच वेगळं आहे. एक वेळ अशी होती की, माझ्याकडे प्रचंड काम होतं मी अनेकदा माझ्या बिझी शेड्युलमुळे मला घरी जाता येत नसे. माझी कमाई सुद्धा रणवीर पेक्षा जास्त होती. पण या गोष्टीमुळे आमच्यात कधीच वाद झाले नाहीत. त्यावेळीच मी ठरवलं की, मला त्याच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य व्यतित करायचं आहे.’ दीपिका आणि रणवीरनं आतापर्यंत, 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. याशिवाय लवकरच ते दोघं कबीर खानच्या ‘८३’ या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात रणवीर भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36sfXYJ