मुंबई- अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची वेब सीरिज विरोधातला वाद अजूनही सुरुच आहे. वेब सीरिजचा दिग्दर्शक याने यासंबंधी माफीही मागितली आहे. आता हिने त्याचं माफीपत्र ट्वीट करत त्याला काही प्रश्न विचारले आहेत. तू तुझ्या सिनेमात अल्लाची अशा प्रकारे थट्टा करू शकतोस का असा प्रश्न अभिनेत्रीने विचारला आहे. भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या ट्वीटला कंगनाने प्रत्युतर दिलं आहे. कपिल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘अली अब्बास जफर जी, कधी तुम्ही तुमच्या धर्मावर सिनेमा बनवला आणि त्यानंतर त्यासाठी माफी मागितली का? सगळ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आमच्याच धर्माला का? कधी स्वतःच्या एकमेव देवाची थट्टा उडवून त्याबद्दलही माफी मागा. तुमच्या गुन्ह्यांचा हिशोब भारताचा कायदाच करेल. तो सीन मागे घ्या..'कपिल मिश्रा यांचं ट्वीट टॅग करताना कंगनाने लिहिले की, 'माफी मागण्यासाठी तो राहील तरी कसा? ते थेट थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जीवे मारलं जात नाही तर ते करणं किती योग्य होतं हेही सिद्ध केलं जातं. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याची हिंमत आहे का?' यापूर्वी कंगनाने दुसर्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'ही गोष्ट फक्त कन्टेटची नाहीए. हे रचनात्मकदृष्ट्याही तितकंच वाईट आहे. सीनमधली प्रत्येक गोष्ट आक्षेपार्ह आहे. म्हणूनच विवादास्पद सीन ठेवले गेले. त्यांना फक्त गुन्हेगारीसाठी नाही तर प्रेक्षकांना त्रास देण्यासाठीही तुरुंगात टाकलं पाहिजे.'काय आहे संपूर्ण वाद?तांडव वेब सीरिजमधल्या पहिल्या एपिसोडच्या १७ व्या मिनिटाच्या सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. यात शंकर आणि श्री राम यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं. यानंतर सीरिजवर बंदी आणण्याचीही मागणी करण्यात आली. वाद वाढत असताना पाहून दिग्दर्शक अली अब्बास जफर याने आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत कुणालाही दुखावण्याचा किंवा कुठल्याही धर्म आणि राजकारणाचा पक्षाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असं स्पष्ट केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35VrXBR