मुंबई- आणि दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अनेक महिन्यांपासून समोर येत आहेत. नुकतच कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बटरफ्लाय फिल्टरसह एक फोटो शेअर केला आहे. यात ती कुणाला तरी मिठी मारताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून ती विकीला मिठी मारत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला. चाहत्यांनी सुरू केले कॅट-विकी हॅशटॅग कतरिना कैफचा हा फोटो अनेक चाहते इन्स्टाग्रामवर सेलिब्रेट करत आहेत. लोकांनी #Vickatहॅशटॅग देखील सुरू केला. यापूर्वी कतरिनाने बहिणीसोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक फोटो शेअर केला होता. यात एका फोटोत विकी कौशल दिसत आहे. विशेष म्हणजे लोकांना फोटोत विकी दिसल्यानंतर तिने कतरिनाने तो फोटो सोशल मीडियावरून काढून टाकला होता. कतरिना आणि विकीकडे आहेत अनेक चांगले प्रोजेक्ट कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या डेटिंग चर्चा बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याविषयी दोघांनी अधिकृतपणे काहीही सांगितलं नसलं तरी ते अनेकदा एकमेकांच्या घराबाहेर किंवा पार्टीमध्ये जाताना दिसतात. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती 'फोन भूत' या भयपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी आहेत. यासोबत ती सलमान खानसमवेत 'टायगर ३' मध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल सरदार उधम सिंग आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. लवकरच तो अमर ‘अश्वत्थामा’ सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oypq7n