मुंबई:करोनाचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असणार आहे. संवेदनशील विषयांची मांडणी करणारे दिग्दर्शक हा चित्रपट बनवत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सई पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 'इंडिया ’ असं नाव असलेल्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याविषयी सर्वांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसह प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरू होईल; असं कळतंय. चित्रपटाचं बहुतेक शूटिंग मुंबई आणि आसपासच्या भागात होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3paV7V3