नवी दिल्लीः भारतात PUBG वर बंदी घातल्यानंतर भारतीय गेमिंग कंपनी nCORE गेमिंग ने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत मिळून () नावाच्या गेमची घोषणा केली होती. आता या मल्टीप्लेयर गेमची लाँचिंग तारीख समोर आली आहे. वाचाः FAUG च्या टीजर्सला आधीही पाहिले गेले आहे. परंतु, आता याचा आणखी एक व्हिडिओ टीजर जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारत आणि चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या तणावाला दाखवण्यात आले आहे. FAUG गेम येत्या २६ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी डाउलनोड करण्यासाठी उपलब्ध केला जाणार आहे. याआधी जारी करण्यात आलेल्या टीजर मध्ये चिनी सैनिकांसोबत हाणामारी दाखवण्यात आली होती. परंतु, यावेळी असॉल्ट रायफल्सने बेकायदा गोळीबार करताना दोन्ही सैनिकांना दाखवण्यात आले आहे. गेममधील काही संवाद इंग्रजी आणि पंजाबी भाषेत आहेत. वाचाः ३ मिनिटाच्या या व्हिडिओत गेमचा थीम साँग सुद्धा ऐकायला येतो. तसेच हे साँग बॅकग्राउंडला सुरू असते. या गेमचे डिसेंबर २०२० मध्ये प्री रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले होते. कंपनीचा दावा आहे की, २४ तासांत १० लाख लोकांनी याचे प्री रजिस्ट्रेशन केले आहे. या गेमला केवळ मोबाइल पर्यंत सिमित ठेवण्यात येणार आहे की, याचे पीसी आणि प्ले स्टेशन व्हर्जन सुद्धा लाँच करण्यात येणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या गेमचा ट्रेलर शेयर केला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b6aeeA