Full Width(True/False)

मलायकाने अर्जुनसाठी केला स्वयंपाक, अभिनेत्याने शेअर केली झलक

पणजी- बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कपल्समध्ये आणि यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सध्या दोघं गोव्यात एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. अलीकडेच दोघांनी गोव्यात एकत्र नवीन वर्षाचं स्वागत केलं. मलायका तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीही तिने नववर्षाचे अनेक अपडेट चाहत्यांना दिले. आता अर्जुननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने त्याच्यासाठी कसा चविष्ट स्वयंपाक केला याची झलक दाखवली. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउन्टवर एक स्टोरी शेअर केली. यात मलायकाने त्याच्यासाठी रविवारी खास स्वयंपाक केल्याचं सांगितलं. खास पदार्थाची एक झलकही त्याने यावेळी दाखवली. मलायकाने २०२१ च्या पहिल्या दिवशी अर्जुनसोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाउन्टवर शेअर केला. यात ती अर्जुनच्या खांद्यावर हात टाकून बसलेली दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'ही नवीन पहाट आहे, नवीन दिवस आहे, हे नवीन वर्ष २०२१ आहे.' दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांनी काही महिन्यांपूर्वी धर्मशाळेत एकत्र दिवाळी साजरी केली होती. लॉकडाउन दरम्यान दोघांनाही करोनाची लागण झाली होती. काही दिवस क्वारन्टीन राहिल्यानंतर दोघांनी या आजारावर मात केली होती. काही दिवसांपूर्वी मलायकाने अर्जुन फारच एण्टरटेनर असून तिला नेहमीच त्याच्यासोबत क्वारन्टीन व्हायला आवडेल असं सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hLZqU3