नवी दिल्लीः खूप वाट पाहिल्यानंतर सॅमसंगने अखेर आपले फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यासोबतच सॅमसंगने सेकंड जनरेशन Galaxy Buds Pro सुद्धा लाँच केली आहे. सॅमसंगने नावाचा इवेंट मध्ये Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21+ आणि सोबत सह आपल्या लेटेस्ट प्रोडक्ट्सच्या किंमतीवरून पडदा हटवला आहे. वाचाः सॅमसंगने आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीजमध्ये Samsung Galaxy S21 ला ८४९ यूरो म्हणजेच ७५ हजार ६०० रुपये, Samsung Galaxy S21+ ला १०४९ यूरो म्हणजेच ९३ हजार ४०० रुपये आणि Samsung Galaxy S21 Ultra ला १३९९ यूरो म्हणजेच १ लाख २४ हजार ६०० रुपयांत लाँच केले आहे. यासोबतच सॅमसंगने Second Gen Samsung Galaxy Buds Pro ला १९९ डॉलर म्हणजेच १४,५५१ रुपयांत लाँच केले आहे. सॅमसंगने Galaxy SmartTag Bluetooth tracker ला २१९३ रुपयांत लाँच केले आहे. दोन स्मार्टटॅग खरेदी केल्यास आपल्या केवळ ४९.९९ डॉलर म्हणजेच ३६५५ रुपये मोजावे लागतील. वाचाः Second Gen Samsung Galaxy Buds Pro ला कंपनीने जबरदस्त कलर, जबरदस्त साउंड क्वॉलिटी आणि जबरदस्त फीचर्स सोबत लाँच केले आहे. ईयरबड्सचे नाइज कॅन्सलेशन फीचर जबरदस्त आहे. तसेच यात खास माइक फीचर्स दिले आहे. वाचाः Samsung Galaxy S21 Ultra चे खास फीचर्स सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा मध्ये ६.८ इंचाचा AMOLED Quad HD+ डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 1440x3200 पिक्सल आहे. या फोनचे डिस्प्ले रिफ्रेशन रेट 10Hz पासून 120Hz पर्यंत आहे. Samsung Galaxy S21 Ultra ला कंपनीने १२ जीबी आणि १६ जीबी रॅम ऑप्शन सोबत १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. या फोनला अडवांस octa-core Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या जबरदस्त फोनमध्ये S Pen सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, १० मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि १० मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. यात ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सॅमसंगचा हा मोस्ट अडवॉन्स स्मार्टफोन 100X Space Zoom सपोर्ट सोबत येतो. या फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh बॅटरी दिली आहे. वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग फीचर्स सोबत येते. वाचाः Samsung Galaxy S21 चे खास फीचर्स या फोनममध्ये ६.२ इंचाचा फुल HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. याचे डिस्प्ले रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. या फोनला सॅमसंगने octa-core Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या फोनला ४ कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचे प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, १२ मेगापिक्सलचा ड्यूल पिक्सल सेन्सर आहे. या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत लाँच केला आहे. तर फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,000mAh बॅटरी दिली आहे. वायरलेस चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये मिळतो. वाचाः Samsung Galaxy S21+ ची खास वैशिष्ट्ये Samsung Galaxy S21+ मध्ये ६.७ इंचाचा full-HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. या फोनचे डिस्प्ले रेट 120Hz आहे. कंपनीने या फोनला Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सोबत लाँच केले आहे. यात प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सल आहे. १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनला १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत लाँच केले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,800mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XKig4A