Full Width(True/False)

Vivo Y51A स्मार्टफोनची भारतात एन्ट्री, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः विवो कंपनीने वाय सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Vivo Y51A या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा 5000mAh बॅटरी आणि १२८ जीबी स्टोरेज सारखे खास वैशिष्ट्ये आहेत. या फोनला २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले आहे. Vivo Y51A ला मेक इन इंडिया अंतर्गत विवोच्या ग्रेटर नोएडा येथील फॅक्टरीत बनवले आहे. वाचाः Vivo Y51A ची किंमत या स्मार्टफोनला १७ हजार ९९० रुपयांत लाँच केले आहे. विवोचा हा फोन टायटेनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये आहे. फोनला विवो इंडिया ई-स्टोर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि अन्य दुसऱ्या स्टोरवरून खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी कार्ड सोबत फोन खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. झीरो डाउन पेमेंट स्कीम अंतर्गत या फोनला कंपनीने लाँच केले आहे. वाचाः Vivo Y51A चे खास फीचर्स विवोच्या या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. फोनचा रिझॉल्यूशन (2408×1080 पिक्सल) आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम ६६२ प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज या फोनमध्ये दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. विवोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः विवोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड फनटच ओएस ११ वर काम करतो. फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ओटीजी, यूएसबी टाइप-सी, ग्लोनास यासारखे फीचर्स आहेत. तसेच स्मार्टफोन मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास, फिंगरप्रिंट सेंसर आणि जायरोस्कोप दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3byB92V