नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअॅपने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे युजर्संना पॉलिसी संबंधी जाणून घेण्यासाठी आणि त्याची समिक्षा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. व्हॉट्सअॅपने सांगितले की, लोकांमध्ये या अपडेटची चुकीची माहिती जास्त पसरली आहे. त्यामुळे कंपनीने प्रायव्हसी अपडेट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचाः ब्लॉग पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपने पुढे म्हटले की, आम्ही तारीख पुढे ढकलत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही अकाउंट डिलीट किंवा सस्पेंड केले जाणार नाही. तसेच आम्ही व्हॉट्सअॅप प्रायव्हसी आणि सुरक्षा आदीविषयी चुकीची माहीती पसरली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाचाः व्हॉट्सअॅपने नुकतीच आपल्या युजर्संना शर्थी आणि गोपनीयतासंबंधी अपडेट देणे सुरू केले होते. व्हॉट्सअॅपने यासंबंधी सांगितले होते की, युजर्संचा डेटा कशा पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातो. तसेच फेसबुक सोबत डेटा शेयर केला जातो. अपडेट मध्ये हेही सांगितले होते की, व्हॉट्सअॅपची सेवा जारी करण्यासाठी युजर्संना ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांच्या अटी व शर्थी सहमती कराव्या लागतील. यामुळे इंटरनेटवर व्हॉट्सअॅपच्या फेसबुकसोबत युजर्संची माहीती शेयर करण्यावरून वाद सुरू झाला होता. वाचाः यानंतर सिग्नल आणि टेलिग्राम यासारख्या प्रतिस्पर्धी अॅप डाउनलोड मध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली होती. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही या वादात उडी घेतली होती. त्यांनी व्हॉट्सअॅपचा वापर बंद करण्याचे आवाहन लोकांना केले होते. कंपनीने आपले धोरण आणि अपडेट विषयी स्पष्टीकरण दिले होते. हे स्पष्ट होणे गरजेचे आहे की, अपडेट कारभार संबंधी माहिती देण्यासाठी आहे. याचा फेसबुक सोबत डेटा शेयर करण्यावर आमच्या धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, लोकांच्या चिंता पाहून व्हॉट्सअॅपने तुर्तास हे अपडेट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे . वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38Qj4vr