Full Width(True/False)

WhatsApp मध्ये येत आहे 'हे' जबरदस्त फीचर, चॅटिंगची मजा आणखी वाढणार

नवी दिल्लीः आपल्या युजर्सचा चॅटिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी नवीन नवीन फीचर आणत आहे. या यादीत आता WhatsApp मध्ये स्टिकर शॉर्टकट Sticker Shortcut नावाचे एक फीचर येण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर लवकरच ग्लोबल युजर्संसाठी रोलआउट केले जाऊ शकते. वाचाः चॅट बारमध्ये दिसणार नवीन फीचर WABetaInfo ने WhatsApp मधील स्टिकर शॉर्टकट फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे फीचर चॅट बारमध्ये पाहायला मिळू शकते. रोलआउट झाल्यानंतर युजर्सला चॅट बारमध्ये इमोजी एन्टर करण्यासाठी किंवा कोणताही शब्द लिहिल्यावर वेगळ्या रंगात वेगवेगळे आयकॉन दिसतील. तर कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर व्हॉट्सअॅपचे सर्व स्टीकर पाहता येतील. वाचाः बीटा युजर्ससाठी लवकरच रोलआउट WABetaInfo च्या माहितीनुसार, कंपनी या फीचरला आता अँड्रॉयड डिव्हाइससाठी तयार करीत आहे. लवकरच या फीचरला व्हॉट्सअॅप बीटा युजर्ससाठी रोलआउट केले जाऊ शकते. वाचाः नवीन स्टिकर पॅक झाले रिलीज स्टिकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस बेस्ड अॅप्ससाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅकला रिलीज केले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप वेब साठी उपलब्ध करण्यात आले आहे. १.४ एमबी साइजच्या या स्टिकर पॅकचे नाव Sumikkogurashi आहे. जगभरात व्हॉट्सअॅप युजर या फीचरला व्हॉट्सअॅप स्टिकर स्टोर वरून डाउनलोड करु शकतात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3phBn2a