Full Width(True/False)

Airtel vs Jio: ३४९ आणि ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान, कोण देतेय जास्त फायदा?

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आणि एअरटेल कडे अनेक असे प्रीपेड प्लान आहेत. जे ऑल इन वन कॅटेगरीत येतात. या प्रीपेड प्लानमध्ये डेली डेटा, व्हाइस कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स ऑफर केले जातात. हे प्लान प्रत्येक किंमतीत उपलब्ध आहेत. एअरटेल आणि जिओकडे असा एक प्लान आहे. ज्याची किंमत ३४९ रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स दिले जातात. याशिवाय, ५९९ रुपयांच्या किंमतीचा प्लान दोन्ही कंपन्या ऑफर करीत आहेत. जाणून घ्या ३४९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये कोण जास्त फायदा देत आहे. वाचाः ३४९ रुपयांचा एअरटेलचा प्रीपेड प्लान एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते. एअरटेलचा हा प्लान अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन सोबत येतो. एअरटेल ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क शिवाय एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, विंक म्यूझिक, फ्री हेलो ट्यून्स आणि फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅकचा फायदा मिळतो. वाचाः ५९९ रुपयांचा एअरटेलचा प्लान एअरटेलचा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेली डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री अॅक्सेस मिळते. याशिवाय या प्लानमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि फ्री विंक म्यूझिक यासारखे बेनिफिट्स ऑफर केले जातात. वाचाः ३४९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्रीपेड पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ३ जीबी रोज डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. १०० एसएमएस दिले जातात. जिओ अॅप्स सारखे जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ म्यूझिकचे सब्सक्रिप्शन या रिचार्जवर फ्री मिळते. वाचाः ५९९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेली डेटा दिला जातो. रोज मिळणाऱ्या डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट मिळते. याशिवाय फ्रीमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tMGJoL