गौरी भिडे ० या व्यक्तिरेखेबद्दल तुम्हाला काय वाटतं ?- अनिरुद्ध या व्यक्तीकडे खलनायक म्हणून मी कधीच पाहिलं नाही. त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. त्याचं त्याच्या एका सहकारी महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. तो त्याच्या भावनांशी प्रामाणिक आहे. प्रत्येक माणसाची एक वेगळी किंवा नकारात्मक बाजू असते तशी ती अनिरुद्धचीही आहे. ती फक्त सगळ्यांसमोर आली आहे. खरं तर अनिरुद्ध कुटुंबवत्सल आणि प्रेमळ आहे असं मला वाटतं. ० मालिकेमध्ये सध्या सुरू असणाऱ्या ट्रॅकबद्दल तुम्हाला काय वाटतं, प्रेक्षकांच्या त्यावर काय प्रतिक्रिया येताहेत ?- प्रत्येक स्त्री ही खंबीर असते आणि अरुंधतीमुळे तो खंबीरपणा शब्दरूपी बाहेर पडला आहे. समाजात आत्मसन्मानाबाबत स्त्रिया जागरूक झाल्यात याचा आम्हाला आनंद आहे. माझ्या एका मावशीचा बेळगावहून मला फोन आला की 'मला तुझ्या मुस्काटात मारायची आहे. तू किती त्रास देतोस अरुंधतीला.' अनेक जण येऊन सांगतात की तुमचं काम फार आवडतं पण आम्हाला अनिरुद्धचा राग येतो. ० तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबद्दल तुमच्या घरातून काय प्रतिक्रिया मिळतात?- सगळे मालिका बघतात. माझी लेक शक्यतो बघण्याचं टाळते. माझी बायको मात्र न चुकता बघते. ती बारीकसारीक गोष्टीही बघते आणि अनेकदा आमच्या चुकाही सांगते. त्यामुळे माझ्या घरातच एक समीक्षक आहे. माझं काम बघून वडीलांनाही अनेक जण 'मिलिंदचा अभिमान वाटतो' असं सांगतात. ० अभिनय करता करता फोटोग्राफीची आवड कशी जपता ?- माझ्यासाठी मेडिटेशनसारखं आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी, नैसर्गिक रंग असे फोटो काढायला मला प्रचंड आवडतं. मालिकेमध्ये काम करत असताना फक्त फोटोग्राफी करायला जाणं हे काहीसं अवघड असतं पण मी अनेकदा ते जमवतो. ० हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट किंवा मालिकांमध्ये पुन्हा कधी दिसणार ?- मी एका वेळी एकाच प्रोजेक्टमध्ये रमतो. एकाच वेळी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करायला गेल्यानंतर धावपळ होते आणि मग कामाकडे काहीसं दुर्लक्ष होतं; असं मला वाटतं. '' ही मालिका झाल्यानंतर कदाचित मी काही दिवस आराम करेन आणि मग कुठल्या तरी प्रोजेक्टवर काम सुरू करेन. ० मराठी सिनेसृष्टीनं बदलायला हव्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ?- सगळ्यात आधी मराठी माणसानं बदलायला हवं. हिंदी, इंग्रजी, दाक्षिणात्य चित्रपट मराठी प्रेक्षकांना बघायला आवडतात; पण मराठी चित्रपट फारसे बघितले जात नाहीत. इतर भाषेतील लोक त्यांच्या भाषेतील कलाकारांना डोक्यावर घेतात पण मराठी कलाकारांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. मनोरंजन क्षेत्रातील गोष्टी बदलण्यासाठी ठोस अशी यंत्रणा हवी. मी त्या यंत्रणेचा भाग होईन तेव्हा त्या गोष्टी बदलण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ० नाटकात कुठल्या प्रकारची भूमिका करायला आवडेल ?- 'पुरुष', 'नटसम्राट', 'ध्यानीमनी' यांसारख्या गंभीर नाटकातील भूमिका साकारायला आवडेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q5Sdle