वृत्तसंस्था, नवी दिल्ली ट्विटर इंडियाच्या धोरण प्रमुख यांनी राजीनामा दिला असून, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बड्या सोशल मीडिया कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्याने दिलेला हा दुसरा राजीनामा आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२०मध्ये फेसबुक इंडियाचे धोरण प्रमुख इंकित दास यांनी पदाचा राजीनामा दिला होता. वाचाः ट्विटरने गेल्या आठवड्यात काही अकाउंट ब्लॉक केली होती. शेतकरी आंदोलनाशी संबंधित पोस्टमुळे ही अकाउंट बंद करण्याची सूचना सरकारने केल्यानंतर ट्विटरने संबंधित अकाउंटवर कारवाई केली होती. या प्रकरणाशी कौल यांच्या राजीनाम्याचा संबंध नाही, असे ट्विटरमधील सूत्रांनी सांगितले. कौल याच्याकडे मार्चअखेरपर्यंत पदाची सूत्रे कायम राहतील, असे ट्विटरने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. वाचाः ‘या वर्षाच्या सुरुवातीला महिमा कौल यांनी विराम घेण्यासाठी ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी डिरेक्टर फॉर इंडिया अँड साउथ एशिया या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,’ असे ट्विटरचे पब्लिक पॉलिसी व्हाइस प्रेसिडेंट मोनिक मेश यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ट्विटरचे नुकसान होत आहे. मात्र, पाच वर्षे त्यांनी या भूमिकेत काम केल्यानंतर, वैयक्तिक आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे लोक आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या त्यांच्या इच्छेचा आम्ही आदर करतो. महिमा कौल मार्चअखेरपर्यंत पदावर राहतील,’ असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटरला सरकारने इशारा देण्यापूर्वीच कौल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aN4wfT