Full Width(True/False)

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील श्रेयस झाला बाबा, आगळ्यावेगळ्या बारशाने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

मुंबई- प्रसिद्ध मालिका '' मध्ये श्रेयसची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या कलाकाराच्या घरी पाळणा हलला असून त्याच्या घरात गोंडस मुलीचं आगमन झालं. श्रेयस म्हणजेच अभिनेता २४ डिसेंबर २०२० रोजी बाबा डा. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सचिनने त्याच्या मुलीचं बारसं केलं आहे. परंतु, हे बारसं त्याने जरा हटके पद्धतीने साजरं केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने बारशासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. सध्या करोनाची स्थिती असल्याने सणसमारंभासाठी पै-पाहुण्यांना घरी बोलवणे शक्य नाही. कोणत्याचं कार्यक्रमाला गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे सचिनने आपल्या मुलीचं बारसं फार थाटामाटात न करण्याचा निर्णय घेतला. त्याने घरच्या घरी मोजक्या पाहुण्यांसोबत बारशाचा समारंभ केला आणि त्याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत त्याच्या मुलीचं नावदेखील सांगण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सांगत आहे की, अनेकांना तिच्या बारशाला येण्याची इच्छा होती. परंतु, सगळ्यांना येणं शक्य झालं नाही. ती कुणावरही रागावलेली नाही आणि तिचं नाव मीरा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. प्रेक्षकांना सचिनची ही भन्नाट कल्पना प्रचंड आवडली असून प्रेक्षक या व्हिडिओच्या कल्पनेबद्दल सचिनचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सचिनने चाहत्यांसोबत शेअर केला आणि त्यासोबत लिहिलं आहे की, सध्या करोनामुळे प्रत्येक गोष्टींवर बंधन आहेत. तसं, सणसमारंभ साजरे करण्यावरही निर्बंध आहेत. त्यामुळे आम्ही जास्त कोणाला या समारंभासाठी बोलावू शकलो नाही. पण त्यामुळेच, मला हा सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या कल्पना येऊ लागल्या. म्हणूनच, आमच्या मुलीचा नामकरण सोहळा व्हर्चुअल पद्धतीने साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हाला विनंती आहे की, हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वादही नक्की द्या. सचिनने त्याला मुलगी झाल्याची बातमीदेखील अशीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना कळवली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kuEvGA