Full Width(True/False)

जिओचा जबरदस्त प्लान, २०० जीबी हाय स्पीड डेटा मिळतोय, जाणून घ्या

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे असे अनेक प्लान आहेत. ज्यात फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. जिओच्या कॅटेगरीत डिज्नी प्लस हॉटस्टार प्लान आहे. यात कंपनी एकूण चार प्लान ऑफर करते. १२०८ रुपये, १०२०६ रुपये, १००४ रुपये आणि ६१२ रुपये असे चार प्लान आहेत. ज्यात कंपनी डिज्नी प्लस हॉटस्टर व्हीआयपी वर्षभराचे सब्सक्रिप्शन देते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी १००४ रुपयांच्या डिज्नी प्लस हॉटस्टार रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या. वाचाः १००४ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान जिओच्या १००४ रुपयांच्य पॅकची वैधता १२० दिवस आहे. म्हणजेच ३० दिवसांच्य चार सायकल साठी हा प्लान वैध आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना एकूण २०० जीबी डेटा ऑफर केला जातो. एक सायकल मध्ये जास्तीत जास्त ५० जीबी डेटा खर्च करता येऊ शकतो. मिळणारा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. वाचाः रिलायन्स जिओचा डिज्नी प्लस हॉटस्टार प्लान म्हणजेच ग्राहकांना ३९९ रुपयांचा वर्षाच्या किमतीत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्जवर फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. तसेच या पॅकला रिचार्ज केल्यानंतर एसएमएसची सुविधा सुद्धा मिळत नाही. वाचाः परंतु, जर तुम्ही या किंमतीत डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशीपच्या जागी व्हाइस कॉल आणि एसएमएसची सुविधा घेत असाल तर कंपनी ९९९ रुपयांचा प्लान फायदे घेऊ शकते. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. या पॅकमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत २५२ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना मिळणारा डेटा संपल्यानंतर त्याची स्पीड 64Kbps स्पीड सोबत इंटरनेट सुरू राहते. या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस ऑफर केले जातात. जिओ अॅप्सची सुविधा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/302AfVr