नवी दिल्लीः Xiaomi चा भारतात लेटेस्ट लाँच झालेला स्मार्टफोन Mi 10i ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने नुकतीच फोनच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. लाँच होऊन केवळ तीन आठवड्यात कंपनीने भारतात ४०० कोटींच्या फोनची विक्री केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या सेलमध्ये २०० कोटी रुपयांच्या फोनची विक्री केल्याचा दावा कंपनीने केला होता. वाचाः Xiaomi ने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. तीन आठवड्यात कंपनीने ४०० कोटी रुपायंच्या फोनची विक्री केली आहे. या फोनचा पहिला ऑनलाइन सेल ७ जानेवारी रोजी पार पडला होता. यानंतर शाओमीने सांगितले की, या सेलमध्ये कंपनीने २०० कोटी रुपयांच्या फोनची विक्री केली आहे. Mi 10i ला भारतात २० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. या फोनला ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. तसेच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. फोनला पॅसिफिक सनराइज, मिडनाइट ब्लॅक आणि अटलाटिंक ब्लू कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः फोनचे फीचर्स ड्यूल स्क्रीनच्या या फोनमध्ये 1080x2440 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ३.९ इंचाचा एक सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. जो 1080x1240 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरीच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट दिला आहे. वााचाः फोनचे फीचर्स या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1,080x2,400 पिक्सल्स आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला आहे. सोबत 8nm बेस्ड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC सोबत Adreno 619 GPU दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनच्या बॅकला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. यात Samsung HM2 सेंसर आहे. ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39FDkjA