Full Width(True/False)

Samsung Galaxy M02 स्मार्टफोन भारतात लाँच, ९ फेब्रुवारीपासून सेल

नवी दिल्लीः स्मार्टफोनला अखेर कंपनीने भारतात लाँच केले आहे. हे नवीन मॉडल Samsung Galaxy M01 चे सक्सेसर आहे. या फोनला गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच केले होते. सॅमसंग गॅलेक्सी एम ०२ फोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ३२ जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनची भारतात Poco C3, Redmi 9, Realme C15 आणि Micromax In 1b शी टक्कर पाहायला मिळेल. वाचाः फोनची किंमत Samsung Galaxy M02 स्मार्टफोनच्या ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉन पेजच्या माहितीनुसार, Samsung Galaxy M02 फोनला सुरुवातीला ६ हजार ७९९ रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. ही किंमत इंट्रोडक्ट्री आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मिळणार आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि रेड कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येऊ शकते. या फोनचा सेल Amazon, Samsung India ऑनलाइन स्टोर्स आणि ऑफलाइन स्टोर्स वर ९ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. वाचाः फोनची वैशिष्ट्ये ड्यूल सिम (नॅनो) सॅमसंग गॅलेक्सी एम ०२ फोन अँड्रॉयड १० सोबत वन यूआय वर काम करतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर व ३ जीबी रॅम दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LdE6Lj