Full Width(True/False)

चोरीच्या दोन दिवसांनंतर मिळाले लेडी गागाचे कोट्यवधींचे कुत्रे

लॉस एन्जेलिस- गायिक आणि अभिनेत्री हिच्या श्वानांचा सांभाळ करणाऱ्या मुलाला गोळी मारून तिचे दोन बुधवारी चोरले होते. आता तिचे दोन्ही कुत्रे शुक्रवारी परत मिळाले आहेत. लॉस एन्जेलिस येथील पोलिसांनी ही माहिती शेअर केली. एका महिलेने लेडी गागाचे दोन्ही कुत्रे ऑलिम्पिक कम्युनिटी पोलीस स्टेशनमध्ये आणून दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलिसांनी लेडी गागाच्या प्रतिनिधीला बोलावून ते दोन्ही कुत्रे लेडी गागाचेच आहेत की नाही याची खात्री करून घेतली. एका प्रोजेक्टच्या शुटिंग संदर्भात लेडी गागा सध्या रोममध्ये आहे. लेडी गागाचे कुत्रे कशासाठी चोरले होते आणि शोधून दिलेल्या महिलेकडे कसे पोहोचले हे अजून कळले नाही. लेडी गागाने तिच्या कुत्र्यांबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे ३.६५ कोटी रुपयांचं बक्षिस देण्याचं जाहीर केलं होतं. लेडी गागाला सध्या तिचे गमावलेले दोन्ही कुत्रे मिळाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यासोबतच कुत्र्यांसाठी आपला जीव धोक्यात घालल्याबद्दल रायन फिशरचे आभार मानले. काय आहेत त्यांची नावं- बुधवारी रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली होती. लेगी गागाच्या कुत्र्यांची नावं कोजी आणि गुस्ताव आहे. तिचा अजून एक कुत्रा एशिया घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रेन्च जातीचे बुलडॉग हे सर्वात महागडे आणि प्रतिष्ठित जातीचे कुत्रे म्हणून ओळखले जातात. त्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असते. या सगळ्यात लेडी गागाच्या कुत्र्यांना का लक्ष्य करण्यात आले यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZYcu0B