मुंबई: सध्या देशभरात आणि राज्यातही गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. कायदे आणि न्याय व्यवस्था कितीही कठोर असली तरीही गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस सामान्य स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होत असतानाच आता एका अभिनेत्रीला भर रस्त्यात अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ''मधील एका अभिनेत्रीला काही लोकांनी मारहाण केली आहे. झी मराठीवर सुरू असलेल्या 'कारभारी लयभारी' या मालिकेनं अल्पवधितच प्रेक्षकांवर आपली छाप पाडली होती. या मालिकत शोना मॅडम आणि तिच्या सोबत असणाऱ्या गंगानं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र या गंगाला नुकताच एका भयानक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. काही अज्ञातांनी तिला मारहाण केली असून याची माहिती तिनं स्वतःच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे. गंगानं या व्हिडीओमध्ये तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, काम संपवून घरी जाण्यासाठी मुंबईतील एका बस स्टॉपवर उभी होती. त्यावेळी काही अज्ञात लोकांनी तिला मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या गंगानं रिक्षा पकडून घर गाठलं. पण त्यावेळी तिनं इन्स्टाग्राम लाइव्ह करत तिच्यासोबत घडलेली घटना सांगत मी आता काय करू अशी विचारणा चाहत्यांना केली. या व्हिडीओमध्ये ती खूप घाबरेलेल्या अवस्थेत आणि रडत रडत स्वतःसोबत घडलेला प्रसंग सांगताना दिसत आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, ही मराठी अभिनय सृष्टीतली पहिली तृतियपंथी अभिनेत्री आहे. तिचं खरं नाव आहे. तृतियपंथी असल्यानं तिला बालपणापासूनच अनेक समस्यांचा समाना करावा लागला आहे. याचा खुलासा तिनं युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावर केला होता. या शोचं होस्टिंगही तिनं केलं होतं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला योग्य न्याय मिळावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3szKaOu