मुंबई- बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चा त्याने चाहत्यांना केलेल्या मदतीची असते. करोना काळात सोनूने अनेक गरजवंतांची मदत केली. त्याने लॉकडाउनमध्ये प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या होत्या. इतकंच नाही तर त्याने अनेक प्रवाशांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था केली होती. त्यानंतर, सोनूचं सर्व प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. आजही सोनू अनेक अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे सरसावतो. अनेक युजर सोनूला सोशल मिडीयावर त्यांची मदत करण्यासाठी विनंती करत असतात. नुकतीच एका युजरने सोनूला ट्विटरवर त्याची मदत करण्याची विनंती केली. युजरने सोनूला म्हटलं, 'तू आमचा हिरो आहेस. तू सगळ्यांना मदत करतोस. मी मित्रांसमोर आईची शपथ घेतली आहे की, मी काहीही करून एक स्मार्टफोन घेऊन दाखवेन. पण आता कितीही प्रयत्न केले तरी मी फोन घेऊ शकत नाहीये. माझ्या आईची घेतलेली शपथ वाया जाऊ नये म्हणून मी चिंतेत आहे. कृपया मला मदत करा.' युजरच्या या मागणीवर सोनूने शांतपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, 'आईची शपथ खाऊन कोणाची तरी मदत कर मित्रा. आई जास्त आशीर्वाद देते. फोन तर सगळ्यांकडेच असतात पण आईचे आशीर्वाद नशीबवान माणसाकडेच असतात.' सोनूच्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सोनूच्या चित्रपटांबद्दल बोलायचं तर, तो रणवीर सिंहच्या 'सिम्बा' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या सोनू अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sCgLTQ