Full Width(True/False)

...म्हणून कॅन्सरला मात दिल्यानंतरही राकेश रोशन रोज पितात दारू, स्वतः सांगितलं कारण

मुंबई: अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि प्रसिद्ध फिल्ममेकर काही दिवसांपूर्वीच कॅन्सर सारख्या आजारातून बरे झाले आहेत. २०१८ मध्ये त्यांना काही लक्षणं दिसून आली होती. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर आहे याचा अंदाज त्यांना आला होता. त्यांनी या आजारावर उचपार घेत या आजाराला मातही दिली. त्यांनी अखेर ही कॅन्सरची लढाई जिंकलीच. पण कॅन्सरनंतर त्याची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली. त्यांनी स्मोकिंग करणं पूर्णपणे बंद केलं आहे. पण ते मद्यपान मात्र रोज करतात आणि याचा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे. इटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी कॅन्सरनंतरच्या त्यांच्या लाइफस्टाइलबाबत अनेक खुलासे केले. ते म्हणाले, 'टेस्ट करायला जाण्याआधीच कल्पना होती की मला कॅन्सर आहे. हे सर्व २०१८मध्ये सुरू झालं. जेव्हा मला जीभेच्या खाली काही घाव दिसले. औषध घेऊनही त्यात काही फरक पडला नाही. मला त्यांचा काही त्रास होत नव्हता. वेदना होत नव्हत्या. पण मला स्वतःला सारखं वाटायचं हे कॅन्सरचे घाव असू शकतात. तेव्हा मी माझ्या डॉक्टरांशी बोललो.' परवानगी नाही पण रोज संध्याकाळी पितात दारू राकेश रोशन यांनी सांगितलं, 'या काळात मी कधीच मानसिकरित्या खचलो नाही मी स्वतःला स्ट्रॉन्ग बनवलं होतं. मी स्वतःला ही गोष्ट समजावली होती की, मला हा आजार झाला आहे मला यातून ठिक व्हायचं आहे. टॉप ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर जतिन शाह यांनी भारतात येऊन माझी सर्जरी केली. कीमो आणि रेडिएशनच्या सेटिंग्सनंतर माझी औषधं बद करण्यात आली.' राकेश रोशन पुढे सांगतात, 'मी खूप व्यायाम करतो आणि माझी लाइफस्टाइल खूप हेल्दी आहे. मी धूम्रपान पूर्णपणे बंद केलं आहे. मात्र मद्यपानाची सवय अद्याप सुटलेली नाही. मला परवानगी नाही पण तरीही रोज संध्याकाळी मी २ पेग दारू पितो. कारण यामुळे मी मेंटली फिट राहतो. माझ्या लेटेस्ट PET स्कॅननुसार मी आता पूर्णपणे फिट आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OeIwmp