न्यूयॉर्क- अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार आहे. सोमवारी तिने इन्स्टाग्रामने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. लिसा म्हणाली की, बाळ जूनमध्ये जन्माला येईल. आधीच तिने गरोदरपणाची घोषणा का केली नाही याचं कारण सांगताना ती म्हणाली की, फक्त आळसामुळेच तिला ही गुड न्यूज द्यायला उशीर झाला. लिसाने जो व्हिडिओ शेअर केला, त्या व्हिडिओत काही मिनिटांनी तिचा मुलगा येतो आणि सांगतो लवकरच त्याची छोटी बहीण जन्माला येणार आहे. व्हिडिओत लिसा हेडन आपल्या मुलाला विचारते की मम्मीच्या पोटात काय आहे ते तू सर्वांना सांगू शकतो का? यावर जॅक आनंदाने उत्तर देतो की, माझी बहीण. लिसा आणि तिचा नवरा डिनो लालवानी यांना लिओ नावाचा अजून एक मुलगा आहे. दोन मुलांची आई लिसा हेडन फार फिट आहे. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या फिटनेसचे साक्षी आहेत. लिसाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मॉडलिंग करिअरची सुरुवात केली होती. लिसा हेडन किंगफिशर गर्लही होती. एवढंच नाही तर बर्याच नामांकित मासिकांची कव्हर गर्ल बनली आणि तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं. फेमिना, वर्व, एफएचएम आणि हार्पर बाजार यांसारख्या प्रसिद्ध मासिकांवर लिसा हेडनचे कव्हर फोटो आले आहेत. लिसाबद्दल असं म्हटलं जातं की तिला योगा करण्याची खूप आवड आहे. मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी तिला योग शिक्षक व्हायचं होतं. धावणं हा लिसा हेडनच्या आवडत्या व्यायामांपैकी एक आहे. ती उसैन बोल्टला स्वतःचं आयडॉल मानते. फारच कमी लोकांना माहीत आहे की लिसा केवळ आधुनिक जीवनशैली जगण्यासोबतच ती भरतनाट्यममध्ये पारंगत आहे. लिसा हेडनने 'आएशा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय तिने 'हाऊसफुल ३', 'द शौकीन', 'क्वीन', 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांमध्ये काम केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a1yMUY