Full Width(True/False)

१४ लाखांची रक्कम घेऊन का बाहेर पडली राखी? सांगितलं कारण

मुंबई: मध्ये राखी सावंतचा प्रवास सर्वात रंजक राहिला. तिनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आणि शोच्या अखेरीस तिला बिग बॉसनी एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं होतं. राखीनं या सीझनच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये तर स्वतःची जागा बनवली पण सीझनची विजेती मात्र ती होऊ शकली नाही. राखीनं दुसरा रस्ता निवडला आणि १४ लाखांची रक्कम असलेली बॅग घेऊन राखी या शोमधून बाहेर पडली. विजेतेपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर राखीनं जेव्हा राखी बिग बॉसच्या मंचावर आली त्यावेळी तिनं या पैशांचं काय करणार हे सुद्धा स्पष्ट केलं. राखी सावंतनं १४ लाखांची रक्कम घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सलमान खान समोर सांगितलं, 'मला या गोष्टीचा आनंद होत आहे की, या पैशातून मी माझ्या आईची हॉस्पिटलची सर्व बिल्स भरू शकते.' बिग बॉसच्या घरात असताना एका एपिसोडमध्ये राखी सावंतची आई आजारी असल्याचा खुलासा झाला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. त्यासाठी आता राखीला पैशांची गरज आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करतानाच राखीनं आपल्याला पैशाची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जेव्हा राखीसमोर १४ लाखांच्या रक्कमेचा पर्याय ठेवण्यात आला तेव्हा तिनं तो पर्याय निवडला आणि विजेतेपदाच्या शर्यतीतून ती बाजूला झाली. आणि बिग बॉसचं सर्वात जुनं नातं आहे. ती या शोच्य पहिल्या सीझनची स्पर्धक होती. त्यावेळीही राखीला या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्या सीझनमध्ये ती विजेती होऊ शकली नव्हती. यावेळी राखीनं चॅलेंजर म्हणून बिग बॉस १४ मध्ये एंट्री केली होती. जवळपास अर्धा सीझन संपल्यावर राखीची बिग बॉस १४ मध्ये एंट्री झाली होती. राखीच्या एंट्रीनंतर शोच्या टीआरपीमध्ये वाढ झाली होती. तिनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजनही केलं होतं. बिग बॉसच्या घरात राखीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले होते. यावेळी तिनं तिच्या लग्नाचं सत्य सांगितलं होतं. संपूर्ण शोमध्ये राखीच्या प्रवासात तिचं वैवाहिक जीवन सर्वाधिक चर्चेत राहिलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bs8kTX