मुंबई- अभिनेत्री आणि मॉडेल असलेली माल्वी मल्होत्रा तिच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत होती. इस्पितळात असतांना तिने एक व्हिडीओ बनवला होता आणि इतरांकडून मदत मागितली होती. त्यात कंगना रणौत या अभिनेत्रीचा देखील समावेश होता. माल्वीचं म्हणणं आहे की, कंगनाने याबाबतीत ट्विट तर केलं परंतु मदतीसाठी ती पुढे आली नाही. माल्वीच्या मदतीसाठी कंगनाने केलं होतं ट्विट अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर २०२० सालच्या ऑक्टोबर महिन्यात योगेश कुमार नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. माल्वीने सांगितल्याप्रमाणे, योगेशने तिला लग्नासाठी विचारलं होतं. परंतु तिने नकार दिल्यामुळे त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माल्वीचं म्हणणं आहे की, कंगनाने याबाबतीत ट्विट करूनदेखील तिची मदत केली नाही. तिला कंगनावर प्रचंड विश्वास होता. त्यावेळेस तिने डॉक्टरांच्या मदतीने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. कंगनाने तो व्हिडिओ पाहून ट्विटसुद्धा केलं की, ती माल्वीला मदत करेल व तिच्या बाजूने उभी राहील. पण तिने असं काहीही केलं नाही. उर्मिला मातोंडकर यांनी केली माल्वीची मदत माल्वीने सांगितलं, 'मी इस्पितळातून डिस्चार्ज झाले आणि माझी मदत करणाऱ्यांची वाट पाहात होते. परंतु त्यांच्या टीम मधून कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही. त्या परिस्थितीत माझी मदत करणारी एक व्यक्ती होती, ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. मला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. तरीही त्यांनी माझी खूप मदत केली. त्या सुरुवातीपासूनच मला मदत करत होत्या.' उर्मिला यांनी तिला महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेविषयी नवीन करण्यात येणाऱ्या कायद्यांबद्दलही सांगितले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aTB4Vn