मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून फिल्ममेकर सातत्याने काँग्रेसविरोधी पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंडित यांनी आपल्या पोस्टमध्ये नेते आणि प्रवक्ता गौरव भाटिया यांना टॅग करत लिहिलं की, 'सामान विकायचं असेल तर OLX वर विका, विश्वास विकायचा असेल तर काँग्रेसमध्ये जा.' गौरव यांनीही पंडित यांचं हे ट्वीट री-ट्वीट केलं. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. वीर सावरकर नावाच्या एका युझरने लिहिले की, 'आणि जे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येतात त्यांचं काय? ते काय निष्कलंक होऊन जाणार का?' योगेश कौशल नावाच्या एका व्यक्तीने लिहिले की, हे १०० टक्के खरं आहे. हा शब्दच त्या गोष्टीची ओळख आहे. कॉन म्हणजे भ्रष्टाचार. अजून एका युझरने लिहिले की, 'शेतकऱ्याचा बटाटा ६ रुपये किलोने विकला जातो म्हणून तो दुःखी आहे. आम्हाला तो ३० रुपये किलोने मिळतो म्हणून आम्ही दुःखी आहोत. मधले २४ रुपये खाणारे आंदोलन करत आहेत आणि सध्या तेही दुःखी आहेत.' या ट्वीटमध्ये काही युझरने काँग्रेसवर निशाणा साधला तर काहींनी भाजप पक्षावरही टीका केली. एका युझरने लिहिले की, 'मोदींच्या राजमध्ये तर पंचर छाप व्यक्तीही स्वतःच्या प्रॉपर्टी करत आहेत.' बातमी लिहीपर्यंत अशोक पंडित यांचं हे ट्वीट १.७ हजार लोकांनी री- ट्विट केलं होतं तर ६० हून जास्त लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. सुमारे १२ हजारांहून जास्त लोकांनी हे ट्वीट लाइकही केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j7BlI6