Full Width(True/False)

'कोणते कपडे घालायचे हे तुम्ही नाही ठरवायचं', अभिनेत्री भडकली

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंसाठी ओळखली जाते. चाहत्यांमध्ये ती कायम या गोष्टींमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचं मत बिनधास्तपणे सोशल मीडियावर मांडत आली आहे. काही दिवसांपूर्वी दिव्या एका फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. दिव्याने टॉपलेस फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोंमुळे ती ट्रोल झाली होती. युजर्सनी तिच्या फोटोंवर अनेक अश्लील कमेंटदेखील केल्या होत्या. आता मात्र दिव्याने या ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. दिव्याने 'स्प्लिट्सव्हीला १०' या रिअॅलिटी शोमध्ये आणि 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' या चित्रपटात काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी एक टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या फोटोंवरून सोशल मीडियावर यूजर्सनी तिला ट्रोल केलं. फोटोंवर आलेल्या अश्लील आणि घाणेरड्या कमेंटला अखेर तिने उत्तर दिलं आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रोलर्सच्या कमेंटचे स्क्रिनशॉट शेअर करत लिहिलं की, 'एका कॉन्सेप्टवर काम केलं आणि लोकांना वेड लागलं. तुम्ही नाही सांगू शकत की कोणी काय घालायचं. तुम्ही नका ठरवू, मी कोणते कपडे घालायचे. पारंपरिक घालायचे की दुसरे काही हे तुम्ही नका सांगू. दुःख या गोष्टीचं आहे की, एका व्यक्तीचं चारित्र्य त्याच्या कपड्यांवरून ठरवलं जातं.' फक्त इन्स्टाग्राम नाही तर एका मुलाखतीदरम्यान तिने ट्रोलर्सबद्दल काही वक्तव्य केली होती. ती म्हणाली, 'मी याबाबतीत जास्त विचार नाही करत. मी यावर विचार नाही करत की मला काय पोस्ट करायला हवं. ट्रोलर्स डोक्याला ताप असतात. हे फोटो माझ्या स्वतःच्या इन्स्टाग्रामसाठी काढले गेले होते. मी काहीतरी नवीन करण्याचा विचार करत होते.' दिव्याचे इन्स्टाग्रामवर सध्या २.१ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b0X16a