Full Width(True/False)

स्पृहा जोशीला वेड सेंद्रिय शेतीचं, माहिती पाहून तुम्हीही कराल विचार

मुंबई: मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या सोशल मीडियाचा वापर तिने फक्त स्वतःपुरताच न ठेवता समाजपयोगी गोष्टींसाठीही ती आपल्या यूट्यूब चॅनलचा वापर करताना दिसते. कविता वाचन असो किंवा आवडलेल्या पुस्तकाबद्दल काही सांगणं असो, स्पृहाच्या या साऱ्याच व्हिडिओंना चांगला प्रतिसात मिळतो. आता स्पृहाने यात एक पाउल पुढे टाकत पर्यावरण पूरक उपक्रमांविषयी बोलायला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केली आहे. स्पृहानं नुकतंच तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये , त्याचं महत्त्व आणि शेतकऱ्यांसोबतच इतरांनाही होणारे त्याचे फायदे याबद्दल सखोल माहिती ती देताना दिसली आहे. स्पृहानं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यातून तिनं सेंद्रिय शेतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे ही माहिती घेण्यासाठी स्पृहानं स्वतः नाशिकमध्ये जाऊन तिथल्या दोन सेंद्रिय शेती करणाऱ्यांची भेट घेतली. एवढंच नाही तर ते थेट शेतातून ग्राहकांच्या घरी भाजीपाला पुरवण्याचंही काम ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून कसं करतात याचीही माहिती यात आहे. स्पृहानं नाशिकमधील अमोल गोऱ्हे आणि संजय पवार या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून शेतमालाच्या पिकण्यापासून ते विकण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली. ज्यात सेंद्रिय शेतीची गरज का आहे... त्यातून शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार हेसुद्धा स्पृहानं सांगितलं आहे. दरम्यान, स्पृहाच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'सूर नवा ध्यास नवा' च्या महिला विशेष पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qV2lxk