Full Width(True/False)

दिल्ली- मुंबईतील 'या' मार्केटमधून कपड्यांची खरेदी करते सारा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं २०१८ मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सोशल मीडियावर साराचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. ती अनेक प्रसिद्ध फॅशन डिझानरच्या शोची शो स्टॉपर राहिली आहे. वेस्टर्न असो वा इंडियन सारा कोणत्याही आउटफिट्समध्ये सुंदर दिसते. नवाब घराण्यातली सारा ब्रँडेड कपडेच वापरत असेल असं सर्वांनाच वाटत असेल पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच नाही. काही दिवसांपूर्वीच सारा अली खाननं Elle India ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं तिच्या आउटफिट्सविषयी चर्चा केली. नेहमीच देसी लुकमध्ये दिसणाऱ्या सारानं या मुलाखतीत सर्वांना चकित करणारा खुलासा केला. ब्रँडेड कपड्यांपेक्षा मुंबईतील मार्केटमध्ये शॉपिंग करणं मला आवडतं असं सारानं या मुलाखतीत सांगितलं. सारा म्हणाली, मला कपड्यावर जास्त पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. मला ब्रँडेड कपड्याची आवड नाही. अनेक ब्रँड्स असे आहेत ज्यांच्या कपड्यांची किंमत माझ्या महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरोजिनी नगरमधील मार्केटमधून सलवार कमीज आणि चपला विकत घेण्यात मी आनंदी असते. सारानं पुढे सांगितलं, 'लहान असताना मी प्लस साइझ होते त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा काय बोलतात याने मला काहीच फरक पडत नाही. लोकांना मी कशी दिसते यावर माझा आनंद कधीच अवलंबून नसतो. मी स्वतःला स्वतःच्या नजरेत असं तयार केलं की लोकांना मी कशी आवडते किंवा आवडत नाही याने मला काहीच फरक पडत नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qMPFsz