Full Width(True/False)

करिना नाही तर 'हे' होतं बेबोचं जन्मानंतरचं नाव, खास कारणामुळे करण्यात आला बदल

मुंबई: काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. करिनाच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याचं नाव काय ठेवलं जाणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वांनाच माहीत आहे की करिनाचा पहिला मुलगा तैमुरच्या नावावरून बरेच वाद झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, करिनाचं नाव तिच्या आजोबांनी करिना नाही तर काही वेगळंच ठेवलं होतं. करिनाच्या जन्माच्या बरोबर ६ दिवस अगोदर तिची चुलत बहीण आणि ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरचा जन्म झाला होता. त्यावेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. अशात गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्या नावांवरून प्रेरित होऊन आजोबा राज कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या मुलीचं नाव रिद्धिमा आणि रणधीर कपूर यांच्या मुलीचं म्हणजेच करिनाचं नाव ठेवलं होतं. पण पुढे ऋषी आणि नीतू कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव रिद्धिमा हेच ठेवलं पण रणधीर आणि या दोघींची नावं फारच मिळती-जुळती असल्यानं बबिता कपूर यांनी सिद्धिमा हे नाव बदलून तिचं नाव करिना असं ठेवलं. बबिता कपूर बेबोचं नाव करिना का ठेवलं याच्या मागेही एक रंजक कथा आहे. बबिता करिनाच्या वेळी गरोदर असताना त्या लिओ टॉलस्टॉयचं Anna Karenina हे पुस्तक वाचत होत्या. या पुस्तकाच्या नावावरूनच त्यांनी आपल्या मुलीचं नाव करिना असं ठेवलं. करिनाची मोठी बहीण करिश्मा कपूर हिचं निकनेम लोलो असं आहे. अशा वेळी रणधीर कपूर यांना आपल्या मुलींची नावं मिळती-जुळती आणि थोडी गंमतीशीर हवी होती. त्यामुळे त्यांनी करिनाचं निकनेम बेबो असं ठेवलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r2V92q