Full Width(True/False)

छोटे नवाब लवकरच येणार सर्वांसमोर; करिना-सैफनं आखलाय 'हा' स्पेशल प्लॅन

मुंबई: अभिनेत्री करिना कपूरनं २१ फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करिना-सैफ दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. करिना-सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर या दोघांच्याही असंख्य चाहत्यांना बाळाची पहिली झलक पाहण्याचे वेध लागले आहेत. करिना आणि सैफनं अद्याप बाळाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. तसेच पॅपराजीच्या कॅमेरापासूनही त्यांनी नव्या बाळाला दूर ठेवलं आहे. त्यामुळे करिना-सैफचा मुलगा कसा दिसतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण सैफ-करिनानं बाळाला जगासमोर आणण्यासाठी खास प्लान आखल्याचं बोललं जात आहे. करिना-सैफच्या बाळाला अद्याप कोणीच पाहिलेलं नाही. पण आपल्या छोट्या नवाबला सर्वांसमोर आणण्यासाठी सैफ आणि करिनानं स्पेशल प्लानं केला आहे. त्यांचा पहिला मुलगा तैमुरचा पहिला फोटो त्यांनी पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र करोना व्हायरसमुळे नव्या बाळाला सर्वांसमोर आणण्यासाठी त्यांना खास प्लान केला आहे. आपल्या दुसऱ्या बाळाला करिना-सैफ तिच्या सोशल मीडियावरून सर्वांसमोर आणणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करिना सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर करिनाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे करिना यावेळी बाळाला एका लाइव्ह सेशनमध्ये सर्वांसमोर आणेल. करोना व्हायरसच्या काळात सैफ त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खूपच जागरुक असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैफ-करिनानं बाळाच्या व्हर्चुअल इंट्रोडक्शनची तयारी केल्याचं बोललं जात आहे. करिना-सैफ नव्या बाळाला करोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी सुरुवातीपासूनच घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी बाळाच्या जन्मानंतर मित्रमैत्रींणींसोबत कोणत्याही पार्टीचं आयोजन केलेलं नाही. तसेच बाळाचं स्वागतही साध्या पद्धतीनं केलं. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष करिनाच्या सोशल मीडियावर लागून राहिलेलं आहे. याशिवाय ती बाळाचं नाव काय ठेवणार याबाबतही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b0LdRp