मुंबई: मागच्या काही दिवसांपासून एका मागोमाग एक ट्वीट करताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी ती नवीन काही ना काही आपल्या ट्वीटमधून शेअर करत असते. दरम्यानच्या काळात तिनं तिच्या खासगी जीवनातीलही काही गोष्टींचे खुलासे केले आहेत. नुकत्याच एका ट्वीटमधून कंगनानं तिचं तिच्या वडिलांसोबतचं नातं कसं बिघडलं याचा खुलासा केला आहे. यात तिनं आपल्या वडिलांवर हात उचलण्याविषयी सुद्धा सांगितलं आहे. तिच्या या ट्वीटनंतर तिच्यावर खूप टीका सुद्धा केली जात आहे. कंगनानं तिच्या ट्विटरवर काही ट्वीट केली आहेत. त्यातील पहिल्या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'माझ्या वडिलांकडे लायसन्स रायफल आणि बंदुका होत्या. लहान असताना ते आम्हाला ओरडायचे नाही तर त्यांचा नेहमीच धाक वाटायची आम्हाला. मी थरथर कापायचे. त्यांच्या तारुण्याच्या काळात ते कॉलेजमध्ये गँगवॉरसाठी प्रसिद्ध होते. ते त्या काळी गुंड म्हणून ओळखले जात होते आणि मी वयाच्या १५ वर्षी त्यांच्याशी भांडण करून घर सोडलं होतं.' दुसऱ्या ट्वीटमध्ये कंगना लिहिते, 'या चिल्लर इंडस्ट्रीला वाटतं की, यश माझ्या डोक्यात गेलं आहे म्हणून मी अशी वागतेय आणि ते मला ठिक करू शकतात. मी नेहमीच बागी होते. पण यश मिळाल्यावर माझा आवाज बुलंद झाला. आज मी देशातला एक महत्त्वाचा आवाज आहे. या गोष्टीचा इतिहास साक्षीदार आहे की, ज्या लोकांनी मला सुधारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाच मी सुधारलं आहे.' कंगनानं यानंतर आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं तिच्या वडिलांचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. तिनं लिहिलं, मी जगातली सर्वात चांगली डॉक्टर व्हावं असं माझ्या बाबांना वाटायचं. त्यांनी वाटायचं की मला चांगल्या नामांकित शाळा-कॉलेजमध्ये शिकवून ते एक क्रांतिकारी झाले आहेत. पण मला हे करायचं नव्हतं आणि जेव्ही मी शाळेत जायला नकार दिला तेव्हा त्यांनी मला मारण्यासाठी हात उगारला. मी त्यांचा हात पकडला आणि त्यांना म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर हात उचलला तर मी पण तुमच्यावर हात उचलेन. कंगना पुढे लिहिते, 'हा आमच्या वडिल आणि मुलीच्या नात्याचा शेवट होता. त्याच्या डोळ्यातले भाव बदलले. त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं नंतर माझ्या आईकडे पाहिलं आणि त्या रुममधून निघून गेले. मला समजलं होतं की, मी माझी मर्यादा ओलांडली आहे. त्यानंतर मी त्यांचं मन कधीच जिंकू शकले नाही आमचं नातं कधीच पूर्ववत झालं नाही. पण यावरुन तुम्ही समजू शकता की माझ्यावर कोणी बंधन लादण्याचा प्रयत्न केला तर मी काय करु शकते.' कंगनाच्या या ट्वीटनंतर तिच्यावर सोशल मीडियावरून खूप टीका केली जात आहे. आपल्या वडिलांशी असं कोण बोलू शकतं असं सर्वांस म्हणणं आहे. एका युझरनं लिहिलं, 'हिंदू धर्मात वडिल देवासमान असतात. त्यांच्याशी अशा भाषेत बोलणाऱ्या तुझ्यासारख्या मुलीला लोक पाठिंबा कसे काय देतात. असे लोक आंधळे आहे.' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'तुला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s5A8UO