Full Width(True/False)

राखी सावंतची आई हॉस्पिटलमध्ये दाखल; लढतेय कॅन्सरची लढाई

मुंबई- एकीकडे '' मध्ये रोज नवनवे धमाके करताना दिसत आहे तर दुसरीकडे तिच्या आईला इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पित्ताशयाचं ऑपेरेशन करण्यात आलं आहे. राखीचा भाऊ राकेश सावंतने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईच्या पित्ताशयातील ट्युमरचं रुपांतर आता कॅन्सरमध्ये झालं असून त्याला पूर्णपणे नष्ट करता येणार नाही. त्यामुळेच तिच्यावर केमोथेरपी करण्यात येत आहे.. राकेश पुढे म्हणाला की, 'आमच्या आईचं ऑपरेशन शनिवारी करण्यात आलं. तिच्या पित्ताशयात खूप मोठा ट्युमर आहे. त्या ट्युमरचं कर्करोगामध्ये रुपांतर झालं. या ट्युमरचं ऑपरेशन करणंदेखील शक्य नाही. त्यामुळे डॉक्टर सोमवारपासून किमोथेरपी सुरू करणार आहेत. आम्ही देवाकडे आईच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. ती लवकर बरी झाली पाहिजे.' राखी सावंतला आईबद्दल कसे सांगितले राखीला आईच्या तब्येतीची माहिती देण्याबद्दल राकेश म्हणाला की, 'आम्ही मालिकेच्या निर्मात्यांना याबाबतीत सांगितलं असून त्यांनी राखीला शनिवारीच परिस्थितीची कल्पना दिली आहे. माझ्या आईची इच्छा आहे की राखी ' १४' ची विजेती होऊन घराबाहेर पडावी. राखीचा आतापर्यंतचा खेळ पाहून आई खुश आहे. तिने शुक्रवारीदेखील मालिकेचा भाग पाहिला होता. राखी आपल्या आयुष्याची म्हणजेच करिअरची दुसरी इंनिंग चांगली खेळते आहे याचा तिला आनंद आहे.' राखीने खेचली अभिनवच्या पॅन्टची नाडी शुक्रवारी दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये राखीने अभिनव शुक्ला याच्या पॅन्टची नाडी ओढली होती, ज्यावरून खूप गोंधळ झाला होता. याबाबतीत विचारणा करण्यात आली असता राकेशने स्पष्टीकरण दिलं. 'राखी सगळ्यांचं मनोरंजन करत होती. तिने तिची कोणतीही सीमा पार केली नाही. आम्ही पूर्ण कुटुंबाने तो भाग पाहिला आणि सर्वांना राखीचा अभिमान आहे. राखीला माहीत आहे की तिचं लग्न झालं आहे आणि घरी तिचा नवरा आहे. ती कधीच अशी कोणतीच गोष्ट करणार नाही ज्याने नवऱ्याला लाज वाटेल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2L53HWG