Full Width(True/False)

जॅकी श्रॉफ यांना ताज हॉटेलमध्ये करायची होती नोकरी, पण नशिब बदललं

मुंबई : ऐंशी, नव्वदच्या दशकामधील सुपरहीट अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता यांचे नाव टॉपला आहे. जवळपास चार दशकं सिनेसृष्टीमध्ये काम करत प्रेक्षकांना त्यांनी आपलसं केलं. इतकच नव्हे तर रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारत त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्या गाजवलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर सातासमुद्रापलिकडे पोहचलेल्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ‘सौदागर’, ‘राम लखन’, ‘रंगीला’, ‘बॉर्डर’, ‘रुप की राणी चोरों का राजा’ असे अनेक चित्रपट सुपरहीट हिंदी चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. त्यांच्या चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. जग्गु दादा म्हणून त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण झाली आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका अगदी आजही प्रसिद्ध आहेत. १ फेब्रुवारी १९५७मध्ये सामान्य कुटुंबात जॅकी यांचा जन्म झाला. मॉडलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पण हे सारं करत असताना त्यांना बऱ्याच अडचणींचा ही सामना करावा लागला. जॅकी यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. अभिनेय क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नाव कमावलं. पण खरं तर विविध खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असलेल्या जॅकी यांना ताज हॉटेलमध्ये शेफची नोकरी करायची होती. कदाचित हे फार कमी जणांना ठाऊक असेल पण त्यांनी ताज हॉटेलमध्ये शेफच्या नोकरीसाठी प्रयत्न ही केला होता. मात्र या नोकरीसाठी त्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नव्हतं. त्यामुळे त्यांच शेफ बनण्याचं स्वप्न ही अपूर्ण राहिलं. त्यानंतर त्यांनी मॉडलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पण आजही बॉलिवूड वर्तुळामध्ये त्यांच्या हातचं वांग्याचं भरीत खूप प्रसिद्ध आहे. मॉडलिंगपासून जॅकी यांनी करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच नशीबच बदललं. अभिनेते देव आनंद यांच्याबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. २००पेक्षा अधिक चित्रपट करणाऱ्या या अभिनेत्याने अनेक पुरस्कारही पटकावले. १९९०मध्ये त्यांना पहिल्यांदा ‘परिंदा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39B2Lmr