मुंबई- आंतरराष्ट्रीय पॉप गायिक हिने मंगळवारी भारतात सुरू असलेल्या ा संदर्भात एक ट्वीट केलं. तिने आंदोलनाला संमर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे या एका ट्वीटने भारतातील मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. ट्वीटच्या १२ तासांतच हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आणि सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनीही प्रोटेस्टच्या समर्थनार्थ ट्विट केलं आणि आता जगभरातील अनेक कार्यकर्तेही या संबंधी ट्वीट करत आहेत. त्याचवेळी भारतात रिहानाच्या ट्वीटवरून काही सेलिब्रिटींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर ताशेरे ओढले. रिहानाच्या एका ट्वीटने आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं भारतातलं शेतकरी आंदोलन भारतात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आपण शेतकरी आंदोलनाबद्दल का बोलत नाही असं ट्वीट तिने केलं. यासोबतच #FarmerProtest हा हॅशटॅगही वापरला. ट्विटरवर रिहानाचे १०१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि लोकप्रियतेच्या बाबतीत ती जगात चौथ्या स्थानावर येते. रिहानाच्या ट्वीटनंतर भारतातील शेतकऱ्यांचं आंदोलन संपूर्ण जगासमोर आलं. तिचं हे ट्वीट १९२.६ हजार लोकांनी री-ट्वीट केलं. ग्रेटा थनबर्ग हिनेही दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा रिहानाने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सरकारने दिल्लीच्या आसपासची इण्टरनेट सेवा बंद केली ही बातमी ट्वीट करून आपला मुद्दा मांडला. रिहानाच्या ट्वीटनंतर सुप्रसिद्ध स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही ट्विटरवर आपलं मत मांडलं. 'आम्ही भारतातील शेतकर्यांसोबत एकत्र आहोत.' आता या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आपलं मत मांडताना सोशल मीडियावर दिसत आहेत. कंगनाने रिहानाला म्हटलं मूर्ख रिहानाच्या या ट्वीटवर अभिनेत्री कंगना रणौतनं तिला उत्तर दिलं आहे. कंगनानं रिहानाच्या ट्ववीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘यावर कोणीही बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत. जे देशाला तोडण्याचं काम करत आहेत. ज्यानंतर चीन भारताचं तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून नंतर तो कमकूवत झालेल्या प्रदेशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल आणि मग अमेरिकेप्रमाणे चायनिज कॉलनी उभी करू शकेल. तुम्ही मूर्ख आहात पण आम्ही आमचा देश असा विकत नाही आहोत. जसं तुम्ही मूर्ख लोकांनी केलं आहे.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oGxtib