Full Width(True/False)

Myntra Logo वर मिलिंद सोमणचं ट्वीट, म्हणाला- आता पहिल्यासारखं..

मुंबई- मुंबई- भारतात बॉलिवूड सिनेमे आणि मालिका यांबद्दल काहीना काही वाद सुरुच असतो. पण सध्या ई-कॉमर्स वेबसाइट याच्या लोगोबाबत वेगळाच वाद सुरू आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटमुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आणि महिलांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मिन्त्रा वेबसाइटला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाही तर हा वाद इतका वाढला की या वेबसाइटला आपला ब्रँड लोगो बदलावा लागला. आता बॉलिवूड सेलिब्रिटींनेही मिन्त्राच्या लोगोवरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता आणि मॉडेल यानेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंदने मिन्त्राच्या लोगोच्या वादावर ट्वीट करत म्हटलं की, 'आता एम अक्षर पूर्वीसारखं कधीच राहणार नाही.' विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये अभिनेताने मिन्त्राचं नाव कुठेच घेतलं नाही. या वादात लोकांची संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही नेटकऱ्यांनी मिन्त्राला जोरदार ट्रोल केलं आहे तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं आहे. या प्रकरणात सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भगनानी हिनेही ट्वीट करून लिहिलं की, 'नवीन ब्रँडच्या लोगोसाठी तुम्ही राबवलेला प्रसिद्धीचा हा मार्ग चांगला आहे. जाहिरात गुरू नवनवीन युक्त्या शोधून काढण्यात यशस्वी ठरत आहेत. आधी तनिष्कची जाहिराती आणि आता मिन्त्राची. काहीही करून कॉन्ट्रोव्हर्सी करायची आणि त्यातून मार्केटिंग करायचं.' मिन्त्राच्या लोगोची ही तक्रार मुंबईतील एका महिला कार्यकर्तेने केली होती. 'मिन्त्राचा लोगो महिलांसाठी आक्षेपार्ह असून त्यांचा अपमान करणारा आहे असं त्या कार्यकर्तेचं म्हणणं होतं. यावरूनच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर सायबर सेल पोलिसांकडून सांगितले गेले की, 'तक्रारीनंतर मिन्त्रासोबत एक बैठक केली. यावेळी कंपनीचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते. कंपनीने लोगो बदलण्यास सहमती दर्शविली. त्यांनी याबाबत ईमेल पाठवला आहे.' दरम्यान, २००७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या मिन्त्रा कंपनीला २०१४ मध्ये फ्लिपकार्टने विकत घेतलं होतं. अशा परिस्थितीत मिन्त्रा आता देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट झाली आहे. यावर लाखो लोक दररोज खरेदी करत असतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LcJRZF