मुंबई- टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम '' पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन पुन्हा एकदा कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं आहे. परंतु, यावेळेस कार्यक्रमात एक अनोखा ट्विस्ट असणार आहे. 'जिजाजी छत पर कोई हैं' मधील वेडेपणा करून प्रेक्षकांना हसवणाऱ्या त्याचं पात्रांना पुन्हा आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री हिबाने १७ फेब्रुवारी पासून कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून, हा कार्यक्रम १५ मार्च पासून छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'जिजाजी छत पर कोई हैं' चा पहीला टीजर सोनी सब वाहिनीवर दाखवण्यात आला होता. कार्यक्रमात सिप्पीच्या आई वडिलांची भूमिका अनुप उपाध्याय आणि सोमा राठोड साकारणार असून तिच्या विरुद्ध नवोदीत अभिनेता शुभाशीष झा भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'लापतागंज' मधील अभिनेत्री सुचेता खन्ना आणि 'चिडियाघर' मधील गधा प्रसादाची भूमिका करणारे जीतु शिवारे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यावेळेस 'जिजाजी छत पर कोई हैं' ची कथा जिंदल आणि जल्दीराम यांच्या कुटुंबातील जुन्या जमिनीच्या मालकी हक्कावरून होणाऱ्या भांडणांवर आधारित आहे. त्यात एक ट्विस्ट असणार आहे ज्यात, या दोन्ही कुटुंबांच्या पूर्वजांच्या संपत्तीसोबत एक जुनं रहस्य दडलेलं आहे. या कुटुंबांच्या भांडणाचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा व्यवसाय. टीजर मध्ये दाखवण्यात आलेली हवेलीच्या हॉल मध्ये चालणारी महिला कोण आहे? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. १५ मार्च पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pErHOU