Full Width(True/False)

अभिनंदन! सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्या घरात तिसरा पाहुणा

मुंबई- या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठमोळी जोडी आणि यांनी त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचं स्वागत केलं आहे. सखी आणि सुव्रत यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी लग्नगाठ बांधली होती. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. घरच्यांच्या परवानगीने ते लग्नबंधनात अडकले. आता या दोघांच्या आयुष्यात एक नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. हा पाहुणा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून सुव्रत आणि सखीची नवीन गाडी आहे. सुव्रतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीची माहिती दिली. आम्हा दोघांत आता तिसरा आला आहे, असं तो म्हणतोय. सुव्रतने त्याच्या पोस्टद्वारे एक सामाजिक संदेशही दिला आहे. सुव्रत म्हणाला की, 'माझ्या आईला १९९६ पासून एक गाडी असावी अशी इच्छा होती. जवळपास २५ वर्षानंतर तिची ही इच्छा पूर्ण झाली. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे माझ्यासाठीही ही एक आनंदाची गोष्ट आहे. मी पहिली गाडी सेकण्ड हॅण्ड घेतली होती. पण माझी दुसरी गाडी मात्र फर्स्ट हॅण्ड आहे. मी अनेक वर्ष गाडी न घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कामासाठी बस आणि रेल्वेवर अवलंबून राहणं शक्य नाही. शेवटी मी पेट्रोलवर चालणारी गाडी घेतली.' सुव्रतने पुढे लिहिले की, 'माझ्या समाधानासाठी मी एक गोष्ट केली. मी माझ्या गाडीचं इंजिन ऑडिट करून घेतलं. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून मी किती धूर हवेत सोडणार हे काही तज्ज्ञांकडून समजून घेतलं. तो धूर शोषून घ्यायला पुढच्या पाच ते सहा वर्षात साधारण १०० झाडं लावायचा मानस आहे. त्याची सुरुवात म्हणून गाडीचे पेढे वाटण्याआधी काही वृक्ष लावायला म्हणून एक रक्कमही दिली. असंच दर सहा महिन्याला घडावं अशी इच्छा आहे. मग ही झाडं मी गाडी वापरायची थांबवल्यावरही धूर शोषत राहतील.' सुव्रतने यावेळी चाहत्यांनाही या संकल्पनेवर विचार करण्याचं आवाहन केलं. 'तुम्हाला ही कल्पना आवडली असल्यास मी तर म्हणीन हे नव्या युगाची जगण्याची एक पद्धत करुया. दरवेळी नवीन गाडी घेतली की पुढची काही वर्ष आपण झाडं लावायची. आपला धूर आपणच शोषून घ्यायचा. अर्थात हे थोडे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हायला हवे म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा होईल,अन्यथा चुकीची वृक्ष लागवड केल्यानं तोटाही होऊ शकतो.' विशेष म्हणजे त्याच्या या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून अशाच प्रकारे काही नवीन करण्याचा प्रयत्न चाहतेही करणार असल्याचं त्यांनी कमेन्टमधून म्हटलं. दरम्यान, सुव्रतने 'मन फकिरा', 'शिकारी', 'डोक्याला शॉट' व पार्टी' यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZQgUXp