Full Width(True/False)

केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइनमुळे भारतात WhatsApp होऊ शकते बंद?, कारण...

नवी दिल्लीः टेलिकॉम मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी काल एका पत्रकार परिषदेत सोशल मीडियासाठी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. यात टॉप १० गाइडलाइन जारी केल्या असून यातील एका गाइडलाइनमुळे भारतात व्हॉट्सअॅप बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर कुण्याही युजर्सने काही मेसेज टाकला तर तो मेसेज टाकणारा व्यक्ती कोण आहे, याचा तपास कंपनीने करावा, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे, परंतु, हे नियमांच्या बाहेर असून असे कंपनी करीत नाही, असे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. वाचाः ने याआधीही म्हटले आहे की, आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मुळे आम्ही हे माहिती करू शकत नाहीत की, मेसेज कुणी आणि कुठून केला आहे. याआधी सुद्धा केंद्र सरकारकडून अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, यावेळी ही मागणी नाही. थेट गाइडलाइन आहे. जर WhatsApp ने या गाइडलाइन फॉलो केल्या नाहीत तर केंद्र सरकार यावर काय कारवाई करणार, WhatsApp वर भारतात बंदी आणणार का, हे तीन महिन्यांनंतर स्पष्ट होणार आहे. WhatsApp ने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, कंपनी याची माहिती मिळवू शकत नाही. वाचाः फेसबुकचे स्पष्टीकरण WhatsApp ची मालकी असलेली कंपनी फेसबुककडून या नवीन गाइडलाइन संदर्भात एक स्टेटमेंट आले आहे. कंपनीने म्हटले की, भारत सरकारने ज्या गाइडलाइन दिल्या आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. फेसबुकने हेही म्हटले की, आमच्या युजर्सची सुरक्षितता आणि सेफ्टीसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. फेसबुक भारतात यापुढेही डिजिटल काम करीत राहणार आहे. वाचाः एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमुळे हे अशक्य कंपनी फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्म संबंधी म्हणते की, ओरिजनल कंटेट लोकांची माहिती मिळवणे अवघड आहे. परंतु, रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत सरकारने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे बंधनकारक आहे. व्हॉट्सअॅपवर काही मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यात काही मेसेज असे असतात त्यावरून दंगली होतात. जातीय तेढ निर्माण होते. परंतु, हे एन्क्रिप्शन युज करणाऱ्या कंपन्यासाठी मोठे अवघड काम होते. या मेसेजची सुरुवात कुठून होते हे शोधणे खूपच अवघड काम आहे. वाचाः व्हॉट्सअॅपने आधीच हे नाकारले व्हॉट्सअॅपमध्ये एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चॅटमुळे हे माहिती करणे अवघड असते की, या मेसेजचा ओरिजनेटर कोण आहे. ही पहिल्यांदा संधी आहे. याआधी असा एक टूल बनवला होता. याचा ओरिजिनेटर कोण आहे. मेसेज कुठून जनरेट केला आहे. परंतु, व्हॉट्सअॅपने उत्तर दिले होते की, असे करणे कठीण आहे. व्हॉट्सअॅपचे जे खास वैशिष्ट्ये आहे. ते राहणार नाही. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी सोबत धोका होईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P2ZVyH